एक्स्प्लोर

Ulhasnagar Crime : भाड्याने खोली दिली नाही म्हणून वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये भाड्याने खोली दिली नाही म्हणून वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला. आरोपी अजय पवार आणि त्याच्या साथीदारांनी एका महिन्यात तीन वेळा त्यांच्यावर हल्ला केला.

उल्हासनगर : केवळ भाड्याने रुम द्यायला नकार दिला म्हणून एक वृद्ध महिला आणि तिच्या मुलावर तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध महिला आणि तिचा मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार आहेत. उल्हासनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर एक भागात ही घटना घडली आहे. उषा सिंह ही वृद्ध महिला आपल्या दोन मुलांसह साधूबेला हायस्कूल जवळील गिरधारी चाळ भागात राहते. तिच्या मालकीच्या असलेल्या एक रुम अजय आणि भरत पवार हे दोघे भाड्याने मागत होते. मात्र उषा यांनी त्यांना भाड्याने रुम देण्यास नकार दिला. घर भाड्याने देण्यास नकार देण्याचा कारणही तसंच आहे, हे दोघे भाऊ सराईत गुन्हेगार आहेत आणि या दोघांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहेत, या दोघांच्या गुंडगिरीला कंटाळून पीडित महिला आपल्या मालकीची खोली त्यांना भाड्याने देण्यास वारंवार नकार देत होती. शिवाय एकदा घर भाड्याने दिलं तर हे लोक आपल्याला दर महिन्याचं भाडे पण देणार नाही आणि घरावर ताबा पण घेणार, या भीतीपोटी पीडित महिला या दोघांना खोली भाड्याने देण्यास नकार देत होती.

याच रागातून या दोघांनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने या वृद्ध महिलेवर हल्ला केला. तसंच तिच्या मुलावर आज चॉपरने हल्ला करुन त्याला जखमी केलं आहे. महिन्याभरात या वृद्ध महिला आणि तिच्या मुलांवर तीन वेळा हल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोन्ही वेळा दोन उल्हासनगर पोलीस ठाण्यात अजय आणि भरत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आज पुन्हा त्यांनी उषा यांच्या मुलावर चॉपरने जीवघेणा हल्ला केला. सध्या दोघांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जखमींची चौकशी केली असून गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Embed widget