पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक एनआयएच्या रडारवर
मनसुख हिरण हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयातून दोन पोलीस निरीक्षक एनआयएच्या रडारवर आले आहेत.
मुंबई : मनसुख हिरण खूनाच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या संशयाखाली एनआयएच्या रडारवर दोन पोलीस निरीक्षक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार NIA च्या तपासात ही गोष्ट समोर आली आहे. क्राइम ब्रांचच्या एका पोलीस निरीक्षकाने त्या गाडीला गायमूख पासून ते ठाणे खाडीपर्यंत एस्कॉर्ट केलं होतं. ज्या गाडीमध्ये सचिन वाझे आणि मनसुख हिरण बसले होते आणि त्याच गाडीत मनसुखची हत्या करण्यात आली. रस्त्यात नाकाबंदीमध्ये कोणी अडवू नये म्हणून त्या पोलिस निरीक्षकांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरणच्या गाडीला एस्कॉर्ट केलं होतं.
तर ज्या दिवशी मनसुखची हत्या झाली. त्या रात्री अजून एका क्राइम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाला सचिन वाझे यांनी सीआययुच्या ऑफिसमध्ये थांबायला सांगितले होतं. स्वतःच्या मोबाईलवर येणारे फोन उचलण्यास त्या अधिकाऱ्याला सांगितले होते. मनसुखच्या हत्येच्या वेळी आपण ऑफिस मध्येच होतो. हेच दाखवण्यासाठी सचिन वाझे यांनी त्यांचा फोन त्यांच्या ऑफिसमध्ये सोडला होता. तसेच जर कोणाचा फोन आला तर वाझे बिजी आहेत, असं त्या क्राइम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यास वाझे यांनी सांगितलं होतं.
नंतर सचिन वाझे ईस्टर्न फ्री वे वरून डोंगरी पोलिस स्टेशनला आले. जिथे त्यांनी रियाजुद्दीन काझीला सीआययु ऑफीसमध्ये मुद्दाम विसरलेला स्वतःचा मोबाईल आणायला सांगितलं आणि त्यानंतर या टीमने डोंगरीतील टिप्स बारवर रेड केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 4 मार्च रोजी मनसुख हिरणच्या मोबाईलचे लोकेशन अर्धा तास ठाण्यातील गायमुख परिसरात दाखवत होतं. एनआयएला संशय आहे की मनसुखची हत्या गाडीतच करण्यात आली होती. तर एका सौंष्यताने मनसुखचा मोबाईल वसई मध्ये नेऊन टाकून दिला जेणेकरून तपासच्या वेळीस तपासयंत्रणाची दिशाभूल करता येईल. दुसरा संशयीत मनसुखचा मृत्यदेह ठाण्याच्या रेतीबंदर खाडीमध्ये टाकण्याआधी अर्धा तास घेऊन फिरत होता. तर ठाण्यातील एक क्राईम ब्रांच अधिकारी यांना NIA च्या तपासाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे.
ज्या दिवशी मनसुखची हत्या झाली. त्याच दिवशी म्हणजे 4 मार्च रोजी ठाण्यातील क्राईम ब्रांचचा हा अधिकारी रजेवर होता. आश्चर्य म्हणजे 2 मार्चला या अधिकाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांच्या SOP प्रमाणे अशा रजेसाठी कमीत कमी चार दिवसांआधी अर्ज करावा लागतो. हा तोच अधिकारी होता ज्याने वाझे यांच्या गाडीला गायमुख पासून ते रेती बंदर पर्यंत एस्कॉर्ट केलं होतं. एनआयए या अधिकाऱ्याचा सीडीआर तपासणार आहे आणि हा अधिकारी त्या कालावधीत कोणाकोणाच्या संपर्कात होता. याचा तपास करणार आहे. तसेच येणाऱ्या दिवसात या अधिकाऱ्याला चौकशीसाठी सुद्धा बोलावण्यात येणार आहे.