एक्स्प्लोर

GST विभागाची मोठी कारवाई, सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक

खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुरुवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (GST) करचुकवेगिरी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुरुवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे अशी या आरोपींची नावे आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे.टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय 197 कोटी रुपयांची बनावट बीजक देऊन आणि 29 कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून 29 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल नुकसान केले आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून प्रमोद कातरनवरे हे ही महसूल  नुकसानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे  हिरालाल जैन व  प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी 16 मार्च रोजी अटक केली आहे. या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा 2017 नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अन्वेषण अधिकारी सहायक राज्यकर आयुक्त  श्रीकांत पवार हे राज्यकर उपआयुक्त प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Embed widget