एक्स्प्लोर

Baramati Firing : बारामतीत गोळीबाराचा थरार! खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर झाडल्या गोळ्या; 3 हल्लेखोर CCTV मध्ये कैद

Baramati MIDC Builder Firing Rajan Kolekar: व्यावसायिक राजन कोळेकर यांच्याकडे इन्स्टाग्राम कॉलद्वारे 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्यानंतर, सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केल्याची घटना घडली.

Baramati Firing Case Extortion : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या बारामती शहरात गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बारामती एमआयडीसी (Baramati MIDC) परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर (Rajan Kolekar) यांच्या गाडीवर शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या प्रकारामुळे बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Instagram Extortion Call Baramati Firing : इन्स्टाग्रामवर मागितली 2 लाखांची खंडणी

या थरारक घटनेबाबत समोर आलेली प्राथमिक माहिती अत्यंत धक्कादायक आहे. शनिवारी दुपारी राजन कोळेकर यांना इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी कॉल केला होता. या कॉलद्वारे त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दुपारच्या धमकीनंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी थेट कोळेकर यांच्या घराजवळ धाव घेतली. घराचे गेट उघडून त्यांनी कोळेकर यांच्या गाडीच्या दिशेने दोन राऊंड फायर केले आणि तिथून पळ काढला.

Baramati Police Investigation CCTV : तीन संशयित हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी (Baramati Taluka Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला (Forensic Team) पाचारण करण्यात आले असून, पोलिसांकडून गोळीबाराचे पुरावे गोळा केले जात आहेत.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, त्यामध्ये तीन अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाताना स्पष्टपणे दिसत आहेत. हे हल्लेखोर नेमके कोण आहेत, त्यांचा उद्देश काय होता आणि खंडणीच्या कॉलशी या गोळीबाराचा थेट संबंध आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. बारामतीमध्ये सातत्याने घडणाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही बातमी वाचा :

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती घेणे जीवावर बेतलं; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती घेणे जीवावर बेतलं; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Advertisement

व्हिडीओ

Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget