कल्याण रेल्वे स्थानकावरून अडीच वर्षाचे बाळ पळवले, दोघांना ठोकल्या बेड्या
Crime News : कल्याण रेल्वे स्थानकावरून बाळ पळवून नेणाऱ्या आरोपींना अवघ्या सात दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News : रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या एका अडीच वर्षाच्या मुलाला उचलून नेहणाऱ्या तरुणासह त्याच्या महिला साथीदाराला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात तासात अटक केली आहे. अमित शिंदे आणि पूजा मुंडे असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघे फिरस्ते असून मिळेल ते काम करत उदरनिर्वाह करतात, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
अमित आणि पूजा या दोघांनी मुलाला का पळवलं? त्यांनी आधी असे प्रकार केले आहेत का? मुले चोरणाऱ्या रॅकेटशी संबंधित आहेत का? या अंगाने पोलीस तपास करीत आहेत. रेल्वे स्टेशनवरील सीसीटिव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली आहे. सीसीटिव्ही फुटेज आधारे स्टेशन परिसरासह आजूबाजूच्या परिसरात शोध घेत तांत्रिक तपास करत उल्हास नगर येथील झोपडपट्टीतून या दोघांना जेरबंद करण्यात आलं आहे.
बिहार येथे राहणारी संजुदेवी राजवंशी ही महिला आपल्या अडीच वर्षाच्या चीमुकल्यासह चार दिवसांपूर्वी कल्यानमध्ये आली होती. मोलमुजरी करत उदरनिर्वाह करण्यासाठी तिने बिहारहून कल्याण गाठलं होतं. गेली चार दिवस ती कामाच्या शोधात होती. रात्री झोपण्यासाठी ती कल्याण स्टेशनचा आसरा घेत होती. काल रात्री नेहमीप्रमाणे ती आपल्या चिमुकल्यासह कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या आडोशाला झोपली होती. मुलाला झोप लागल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ती वडापाव घेण्यासाठी मुलाला तिथेच ठेवून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेली. वडापाव घेवून परत येऊन बघितलं असता तिचा मुलगा तिला दिसला नाही. आजूबाजूला बऱ्याच वेळ तिने शोधा शोध केली, विचारपूस केली, मात्र मुलगा न सापडल्याने संजू देवी यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठले. मुलगा हरवल्या बाबतची तक्रार नोंदवली.
रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अर्चना दुसाने, पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने शोध सुरू केला. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण व एक महिला त्या मुलाला घेऊन जाताना दिसून आलं. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू केला. अवघ्या काही तासात सीसीटिव्हीमध्ये दिसणारा हा तरुण व ही महिला उल्हासनगर येथील खेमानी झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत या दोघांनाही अटक केली. या बाळाला सुखरूप ताब्यात घेतलं. अवघ्या सात तासात पोलिसांनी या अडीच वर्षाच्या चिमुकल्याची माऊलिशी भेट घडवून आणली. महिलेने पोलिसांचे आभार मानले.
Before You Go
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!






















