Thane : वाहनचोरी, जबरी लूट करणाऱ्या केरळ गँगच्या पाच जणांना अटक, 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, ठाणे पोलिसांची कारवाई
Thane Crime : ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 ने कारवाई करत केरळ गँगच्या पाच जणांना अटक केली आहे. मुंबई, ठाणे आणि अन्य शहरात लूट करून ते केरळला पळून जात होते.

ठाणे : शहरामध्ये पार्किंग केलेली दुचाकी वाहने, तसेच तोंडावर स्प्रे मारून जबरी लुटीचे प्रकार वाढत असतानाच नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 फेब्रुवारी, 2025 रोजी दाखल झालेल्या 30 लाखाच्या रोकडीची जबरी लुटीच्या तक्रारीवरून ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत 12 एप्रिल रोजी केरळ दरोडेखोरांच्या गँगमधील पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात नेले 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.
21 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार असिफ अहमद रेहमतुल्ला अन्सारी(43) रा. मेहरून कॉम्प्लेक्स, अल्मास कॉलनी, कौसा, मुंब्रा, ठाणे हे काम करत असलेल्या प्रॉमिस इंटरप्रायजेस, काळबादेवी मुंबई या कंपनीचे 30लाख रुपयांची रक्कम बॅगेत भरून, मुंबई येथुन ठाणे रेल्वे स्टेशनवर उतरले. ठाणे स्थानकावरून ओम साईनाथ पार्कीग प्लॅटफॉर्म नं. 1 लगत, रेल्वे कॉलोनी रोड, बी कॅबीन, नौपाडा ठाणे येथे पार्किंग मधील मोटार सायकल काढत असताना, 4अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येवून तक्रारदारांना घेराव घातला.
त्यापैकी एका इसमाने त्याचे कडील बॉटल मधुन त्यांचे तोंडावर स्प्रे मारून रोख रक्कम ठेवलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली होती, त्याबाबत आसिफ अन्सारी यांचे फिर्यादीवरून नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर जबरी लुटीची गंभीर दखल घेत गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-1 यांच्याकडे सोपविला. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करीत घटनास्थळावरील तांत्रिकदृष्ट्या तपास केला.सातत्याने गुन्ह्यातील आरोपींचा पिच्छा पुरवीत अखेर चार आरोपीना मुंबई येथून अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून केरळ राज्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विघ्नेश पोकेम के (31) पत्ता गु, कायोट हाऊस, पो. पोडकुल, ता. वहगुर, जि. कालीकत, राज्य-केरळ, सुहात मोईउद्दीन खोया टी.पी. (31) पत्ता मु, ताळेमरकारेटी, पो. पुदीयनआडी, जि. कालीकत, राज्य केरळ, प्रबुलदेव प्रेमकुमार पुल्लीवता (25) रा. गु, वे, वायाकारा पाहीबोलचल, ता. पेरीनगोम , जि. कन्नूर , राज्य केरळ, अखिल किष्णा टी.पी.(27) रा.मु.पो. तटमेल, जि. कन्नूर, राज्य-केरळ आणि सुबिलेश के. बालकिशनन (32)रा. कंदोड कंडी हाऊस, यारोपोईल आयवेनरी, पो. नारापोईल, जि. कोझीकोड, राज्य केरळ यांचा समावेश आहे.
पोलीस पथकाने अटक आरोपींकडून 7 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. यात आरोपी प्रबुलदेव प्रेमकुमार पुल्लीवता(25) यांच्याकडून लुटलेल्या पैशातून खरेदी केलेला क्रीम कलरचा आय फोन हस्तगत केला. तर आरोपी अखिल किष्णा टी.पी.(27) यांच्याकडून क्रीम कलरचा आय फोन हस्तगत केला. गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस पथक हे आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. या टोळीने या पूर्वी आणखीन किती गुन्हे केलेलं आहेत याचा शोध घे आहेत. तर ठाण्यातील लुटीतील ३० लाखाच्या उर्वरित रक्कमेचंही शोध घेत आहेत.
आरोपींच्या लुटीची कार्यपद्धती
अटक आरोपी हे सर्वच केरळ राज्यातील आहेत. हे आरोपी मुंबई, ठाणे आणि अन्य शहरात जबरी लुटीचे गुन्हे करून केरळ राज्यात पळून जात होते. त्यानंतर काही कालावधीनंतर हे आरोपी पुन्हा जबरी चोरी करण्यासाठी शहरात यायचे आणि पुन्हा लाखोंची लूट करून पोबारा करायचे. अटक आरोपी पैकी एकही आरोपी हा महाराष्ट्रात राहणार नसल्याची माहिती ठाणे गून्हे शखाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.























