एक्स्प्लोर

आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

काशीमीरा पोलिसांनी मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Thane News: आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक यांच्याकडून आरोपीनं पैसे घेतले होते. मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. 2021 पासून आतापर्यंतच्या काळात ही फसवणूक झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

काशीमीरा पोलिसांनी (Kashimira Police) मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होता होता. मात्र आरोपीने फसवणूक केली आहे. सरनाईक यांच्यासोबतच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे हप्तेही आरोपीने भरले नसल्याचं समोर आलं आहे. प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडेही संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे. 

आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्टीन बर्नार्डो, कोरिया नावाच्या एका व्यक्तीसोबत घोडबंदर रोडवरील जमिनीचा व्यवहार केला. सर्वात आधी सरनाईक यांनी या व्यक्तीला व्यवहारादरम्यान, साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही केला. पण तरीसुद्धा या व्यक्तीनं जमिनीचे पेपर्स सरनाईकांच्या नावावर केले नाहीत. तसेच, सरनाईक यांना पैसेही दिले नाही. 

प्रकरण नेमकं काय? 

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होता होता. मात्र आरोपीने फसवणूक केली आहे. पैसे मिळावेत किंवा जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून प्रताप सरनाईक सातत्यानं प्रयत्न करत होते. सरनाईक हे 2021पासून जमिनीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत होते. संबंधित व्यक्तीकडून त्याची टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर सरनाईक यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच या व्यक्तीनं बँकेचे हप्तेच भरले नाहीत म्हणून सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रारही केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget