10 जणांनी घेरलं, आईसमोर डोळ्यात स्प्रे मारुन संपवलं, 6 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, उल्हासनगर हादरलं!
Thane Crime News Update : उल्हासनगरमध्ये 10 जणांनी मिळून 28 वर्षीय तरुणीची हत्या (Thane Crime News) केल्याचं प्रकरण घडलं होतं. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे.
Thane Crime News Update : उल्हासनगरमध्ये 10 जणांनी मिळून 28 वर्षीय तरुणीची हत्या (Thane Crime News) केल्याचं प्रकरण घडलं होतं. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. दहा व्यक्तींनी 28 वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यात मिर्चीचा स्प्रे मारुन निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींना उल्हासनगर न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने या आरोपीना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पोलीस कसून तसाप करत आहेत. राहुल जैस्वाल (वय 28) असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा केला नंतर पळून गेले होते. त्याचा काही एक सुगावा ठाव ठिकाण नसताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी बाहेरगावी पळून जाऊ नये याकरता पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन तात्काळ स्वतंत्र तीन तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातील मुख्य आरोपी प्रेमचंद उर्फ बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकनी वय 28 वर्ष व करण मनोहर ढकणी वय 26 वर्ष यांच्यासह त्यांचे साथीदार संतोष अरुण साळवे प्रणय सुधीर शेट्टी प्रफुल्ल सुरेश कुमावत वसंत राधे ढकणी असे एकूण सहा आरोपींना अत्यंत सिताफिने 24 तासांच्या आत अटक करण्यात आलेली असून त्यांची 15 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केली आहे.
आईसमोरच मुलाला संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात उल्हासनगरमध्ये 28 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात डोळ्यात मिरची स्प्रे मारून दहा जणांच्या गुंडांच्या टोळीने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 3 च्या फॉरव्हल लाईन भागात असलेल्या इमली पाडा परिसरात ही घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे हत्या झालेल्या तरुणाची दुचाकी जाळली. यातील मुख्य आरोपी असलेल्या गुंडावर गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा मागे घेणाच्या वादातून तरुणाची भर रस्त्यात आईसमोरच हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन सहा जणांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस चार आरोपींचा शोध घेत आहेत.
जुन्या वादातून हत्या -
उल्हासनगरच्या फॉरव्हल लाईन परिसरातील इमली पाडा भागात मृतक राहुल कुटूंबासह राहत होता. तर याच इमली पाडा परिसरात राहणार सराईत मुख्य आरोपी बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकणी त्याच्या दोन साथीदारांनी 2022 साली मृतक राहुल याची दुचाकीला जाळली होती. त्यावेळी मृत राहुल याने मुख्य आरोपी बाबू ढकणी विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी बाबू ढकणी याला अटक केली होती. काही दिवसांनंतर बाबू ढकणी हा जेलमधून जामिनावर सुटला होता, त्यामुळे मृतक राहुल आणि बाबू यांच्यात दुष्मनी झाली होती. सदर दुचाकी जाळल्याचा गुन्हा मागे घ्यावा यासाठी मुख्य आरोपी बाबू ढकनी हा दबाव आणत होता, मात्र दाखल गुन्हा मागे घेण्यास मृतक राहुल नकार देत होता.
चार आरोपी फरार
त्याच वादातून राहुल जैस्वाल याच्या घरावर आरोपी बाबूं ढकणी ,करणं ढकणी आणि इतर चार ते पाच साथीदारांनी दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्याची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी राहुल आणि त्याची आई फॉरव्हल लाईन चौकात पोहचताच बाबू ढकणी याने धारधार चाकूने राहुल याच्यावर चाकूने हल्ला करत डोक्यात दगडी लादी टाकून जीवे ठार मारले. ह्या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून पोलिसांनी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान ह्या घटनेनंतर फॉरव्हल लाईन परिसरात हळहळ व्यक्त केली. पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय, ह्या घटनेनंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन पोलीस पथक तयार करुन पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिली आहे.