एक्स्प्लोर

नवीन कपड्यांसाठी 2 अल्पवयीन तरुणांनी अनेकांना लुटले, सोमवारी रात्री ठाण्यात थरार नाट्य

नवीन कपडे घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही चोरी आणि लूट केल्याचे या दोन अल्पवयीन मुलांनी कबूल केले. दरम्यान त्यांना अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

ठाणे : ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांनी नशेच्या धुंदीत तब्बल पाच जणांना जखमी करून त्यांना लुटले आहे. हा प्रकार केवळ एकाच ठिकाणी न करता तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या ठिकाणी हा थरार सुरू होता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोघांनाही पाठलाग करून जेरबंद केले आहे.

रात्री 12.30 वाजता : नितीन कंपनी जवळ…  चाकूने वार,  मोबाईल आणि पैसे घेऊन दोघे फरार

रात्री 12.40 वाजता : कॅडबरी जंक्शन जवळ दीपक विश्वकर्मा यांच्यावर चाकूने वार करून दोघे पळाले.

रात्री 12.45 वाजता : चीतळसर परिसरात … रशीद मुगले या रिक्षाचालकवर चाकूने वार

रात्री 1 वाजता : वर्तकनगर परिसरात संतोष यादव या वेतरवर चाकूने वार करून दोघांनी मोबाईल हिसकावला.

रात्री 1.10 वाजता : लोकमान्य परिसरात केशव पुजारी या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पैसे चोरून दोघे पळाले.

सोमवारी रात्री एकामागे एक घडलेल्या या घटनांमुळे ठाणे पोलीस चांगलेच जागे झाले. या सर्व घटना केवळ दोन अल्पवयीन मुलांनी तडीस नेल्या होत्या. एका चाकूच्या सहाय्याने त्यांनी तब्बल पाच जणांना जखमी केले आणि त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे लुटले.

ज्या वेळी या घटना घडत होत्या त्यावेळी ठाणे पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एकामागे एक फोन वाजत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. वर्तकनगर येथील नाकाबंदीतून हे दोघे निसटण्यात यशस्वी झाले. मात्र चितळसर पोलिसांच्या हद्दीत येताच त्यांनी चोरी केलेली दुचाकी घसरली आणि पोलिसांनी त्यांना धावत पाठलाग करत पकडले.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना समजले की, यातील एक जण 16 तर दुसरा 17 वर्षाचा आहे. नवीन कपडे घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही चोरी आणि लूट केल्याचे या दोघांनी कबूल केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्यांनी दारू पिल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र त्यांनी दारू व्यतिरिक्त अजून कोणती नशा केली होती का? याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान त्यांना अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

इतक्या शुल्लक कारणासाठी जर अल्पवयीन मुले हातात चाकू घेऊन रस्त्यावर रक्ताचे पाट वाहणार असतील तर या पिढीला परिणामकारक समुपदेशनाची गरज आहे. पोलिसांनी देखील अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Accident News: ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून छत्रपती संभाजीनगरला ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 
धक्कादायक! 2 कोटी रुपयांच्या कामासाठी साडेसात लाख रुपयांची लाच; सरपंचाला रंगेहात पकडलं 

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
Embed widget