इश्क में आशिक बना कातिल, 'प्रपोज डे'ला प्रेयसीवर कुऱ्हाडीने वार, 9 वर्षाच्या प्रेमाचा अंत
Crime News : सध्या प्रेमाचा आठवडा सुरु आहे. जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रियकर-प्रेयसी काहीही करायला तयार असतात. पण 'प्रपोज डे'ला तेलंगणात धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News : सध्या प्रेमाचा आठवडा सुरु आहे. जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रियकर-प्रेयसी काहीही करायला तयार असतात. पण 'प्रपोज डे'ला तेलंगणात (telangana ) धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीला कुऱ्हाडीने वार करत संपवलेय. नऊ वर्षांच्या प्रेमात कुटुंबीय आले अन् प्रियकराने कुऱ्हाडीने सपासप वार करत प्रियसीला संपवलेय. प्रपोज डेच्या दिवशीच प्रियकराने हे टोकाचं पाऊल उचलले. कुटुंबीयांच्या दबावामुळे प्रियसी दुर्लक्ष करत होती, त्यामुळे रागाच्या भरात प्रियकराने कुऱ्हाडीने वार करत संपवलेय. तेलंगणात ही धक्कादायक घटना घडली आहे.
'प्रपोज डे' ला प्रेमाचा शेवट
'प्रपोज डे'ला प्रियकर हैवान झाला, त्याने प्रियसीवर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीचं घटनास्थळावर निधन झालं. रागाच्या भरात त्यानं नऊ वर्षाच्या प्रेमाचा शेवट केला. या हल्ल्यानंतर आरोपी प्रियकर फरार झाला.
आरोपीचं नाव जुकांति श्रीकांत असल्याचं समजतेय. 27 वर्षीय जुकांति श्रीकांत याचा पोलीस शोध घेत आहेत. ही धक्कादायक घटना तेलंगणा राज्यामध्ये निर्मल जिल्ह्यातील खानापुरच्या शिवाजी नगर परिसरात घडली आहे. सध्या स्थानिक पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला, असून कसून तपास सुरु आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
9 वर्षांपासून प्रेमात होते -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुकांति श्रीकांत (27) आणि अलेख्या (20) मागील नऊ वर्षांपासून प्रेमात होते. मुलीच्या आई-वडिलांना हे नातं पसंत नव्हतं. त्यांच्या विरोधामुळे मुलीने जुकांति श्रीकांत याच्यासोबत दुरावा ठेवला होता.कुटुंबियांनी मुलीला समजावलं अन् लग्न दुसऱ्या मुलाबरोबर ठरवलं होतं. कुटुंबियाचं म्हणणं पटल्यानंतर मुलीनेही मुलाबरोबर दुरावा ठेवला. प्रेयसीचा दुरावा जुकांति श्रीकांत याला जिव्हारी लागला. त्या रागातून हे हत्याकांड झालं.
संधी साधून प्रियसीवर कुऱ्हाडीने हल्ला -
मिळालेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी अलेख्या शिलाई शिकवणीनंतर घरी परत येत होती. त्यावेळी जुकांति श्रीकांत याने कुऱ्हाडीने तिच्यावर सपासप वार केले. हा हल्ल्यानंतर घटनास्थळावरच अलेख्याचा मृत्यू झाला. अलेख्याला वाचवण्यासाठी आलेली वहिणीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रेयसीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर प्रियकर जुकांति श्रीकांत याने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा :