(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फिल्म कलाकार असल्याचे सांगून चालवायचा चाईल्ड पॉर्नोग्राफीचे रॅकेट, सीबीआयची कारवाई
चाईल्ड पॉर्नोग्राफी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा आणि या कलाकाराचा संबंध असल्याचाही सीबीआयला संशय आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय चाइल्ड पॉर्नोग्राफी रॅकेटचा सदस्य असल्याचं संशय असलेला टीव्ही कलाकार सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. लहान मुलांशी सोशल मीडियावर मैत्री करुन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मागून त्यांना आपल्या आंतरराष्ट्रीय ग्राहकाला विकून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकाळात असे. या कलाकाराचा लॅपटॉप मोबाईल सीबीआयने जप्त केला असून पुढील तपास सीबीआय करत आहेत.
लहान मुलांच सोशल मीडिया वर जास्त वेळ सक्रिय राहणं त्यांच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो हे आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी ही बातमी आहे. इन्स्टाग्राम वरून मुलांशी मैत्री करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओज मागून त्यांना व्हायरल करणाऱ्या एका टीव्ही कलाकारावर सीबीआयला संशय आहे. इतकचं नाही तर चाईल्ड पॉर्नोग्राफी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा आणि या कलाकाराचा संबंध असल्याचाही सीबीआयला संशय आहे.
कशा प्रकारे हा कलाकार लहान मुलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा?
- सर्वात आधी हा अमेरिका युरोप आणि आशिया खंडातील लहान मुलांची इन्स्टाग्रामद्वारे मैत्री करायचा.
- स्वतःला कलाकार सांगून त्यांच्याशी जवळीक साधायचा.
- मैत्रीनंतर तो लहान मुलांना पॉर्न व्हिडीओ आणि फोटोची मागणी करायचा.
- फोटो आणि व्हिडीओ स्वतःच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना विकायचा.
- आत्तापर्यंत एक हजार पेक्षा जास्त लहान मुलांना यानी संपर्क साधला असून त्यांच्याकडे ही मागणी केली आहे.
- ही सर्व मुले 10 ते 16 वयोगटातील आहे.
लवकरात लवकर जास्त पैसा कमावण्यासाठी अशी रॅकेट उदयास येतात आणि हे सर्व ऑनलाईन चालतं असल्यामुळे याचा शोध घेणे कठीण जाते. मात्र मुलांना सोशल मीडिया जास्त वापरू न देणे हेच योग्य असेल.
स्वतःला कलाकार म्हणणारा हा आरोपी हरिद्वारला राहत असून त्याचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहे. वारंवार या लहान मुलांकडून हा असे व्हिडीओ मागवायचा आणि जर त्याने नकार दिला तर ते व्हिडीओ त्याच्या कुटुंबीयांना दाखवायची धमकी देऊन त्यांना सतत आपल्या जाळ्यात अडकून ठेवायचा. एकदा मुलं जर का या रॅकेटमध्ये अडकली तर त्यांचा बाहेर येणं सोपं नसायचं. या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून सीबीआय अजून सबळ पुरावे एकत्रित करत आहे. यामध्ये अजून काही मोठे उलगडे होण्याची दाट शक्यता आहे. मात्र आपल्या मुलांना अशा नराधमांपासून वाचवणे हे पालक म्हणून आपल्याचं हातात आहे.