चुलत्याचं मुंडकं घेऊन बाईकवरुन फिरला, नंतर पोलिसांना शरण, माढा हादरलं
Solapur : माढा तालुक्यातला धक्कादायक प्रकार...जमिनीच्या तुकड्यासाठी वृद्ध चुलत्याचा सावत्र पुतण्याकडून निर्घृण खून, मुंडके गाडीवर घेऊन होता फिरत
अकलूज : सोलापूरमधील माढा (Solapur, Madha) तालुक्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीचे (Crime News) घाव घालून चुलत्याचा खून करून मुंडकं दुचाकीवर घेऊन एक माथेफिरू फिरत होता. त्याला अटक करण्यात आलीय. शिवाजी जाधव (Shivaji jadhav) असं नराधमाचं नाव आहे. त्याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यांचं मुंडकं तोडून ते बाईकवर ठेऊन तो बाईकवर फिरत होता. अखेर अकलूज रोडवर माळीनगर इथे तो शरण गेला. या प्रकारामुळे माढा तालुक्यात (Madha) भीतीचं वातावरण निर्माण झालेय.
माढा तालुक्यातील शेवरे येथे जमिनीच्या तुकड्यासाठी एकाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, चुलत्याचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून करून मुंडके दुचाकीवर घेऊन तो गावभर फिरला. त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या वादातून त्याने चुलत्याचे थेट मुंडके धडावेगळे केले आणि तेच मुंडके घेऊन तो दुचाकीवर फिरत होता . यानंतर त्याने अकलूज रोडवर माळीनगर येथे मुंडके व दुचाकी सोडून अकलूज पोलिसात शरण गेला. या प्रकाराने मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शंकर प्रल्हाद जाधव (वय-65) (शेवरे, माढा) असे खून झालेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी नराधम शिवाजी जाधव या पुतण्याने हत्या केल्याचे समजताच त्याच्या तपासला विविध पथके पाठवण्यात आली. आता पोलिसांचा सासेमिरा चुकवणं अवघड असल्याचे लक्षात येताच या नराधमाने माळीनगर जवळ चुलात्याचे मुंडके आणि मोटार सायकल टाकून दिली. त्यानंतर अकलूज पोलीस ठाण्यात शरण गेला. दरम्यान अकलूज पोलिसांनी चुलत्याचे मुंडके , दुचाकी ताब्यात घेतले आहे. याबाबत मयताचा नातू नरहरी नवनाथ बंडलकर (वय-२३) रा.कुरण वस्ती-शेवरे,ता.माढा याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.