सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात साखळदंडाने बांधलं; पोलिसांनी विचारताच कुणाचं नाव घेतलं?, धक्कादायक महिती समोर
Sindhudurg Crime: सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळदंडातून सुटका केली होती.
Sindhudurg Crime सिंधुदुर्ग: सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून तिच्यावर सध्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती.
सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळदंडातून सुटका केली होती. मात्र ही महिला रोणापालपर्यंत कशी आली, याबाबत पोलीस माहिती गोळा करत आहे. या महिलेची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने तिचा जबाब नोंदवण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलिसांना यात माहिती गोळा करणे कठीण होत आहे.
महिलेकडून पतीचे नाव-
पोलिसांकडून प्राथमिक तपास म्हणून सदर महिलेला काही प्रश्न विचारले. यावेळी ती महिला हे कृत्य पतीकडून केले असं म्हणत होती. सतत ती पतीचेच नाव घेत होती. यावरुन पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेत आहेत.
तीन दिवस उपाशी-
सदर महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
चेहऱ्यावर जखमा, स्तन कापलं, गुप्तांगावर वार, छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह
उरण येथे 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्या करण्यात आली. या तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या. यशश्री शिंदे ही तरुण केल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. तरुणीचा शोध सुरु असतानाच तिचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मृतदेह सापडून दोन दिवस उलटून गेले तरी, आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे उरणमधील संतप्त नागरिकांना प्रशासनाचा निषेध करत मोर्चा काढला आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे.