एक्स्प्लोर

महिला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये पाहताना एकाला अटक, आयआयटी मुंबईमधील धक्कादायक घटना

IIT Bombay: चंदीगड विद्यापीठानंतर आता आयआयटी मुंबईमध्येही एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Bombay) विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

IIT Bombay: चंदीगड विद्यापीठानंतर आता आयआयटी मुंबईमध्येही एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Bombay) विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीचा आरोप आहे की, रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंटू गरिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. 

हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, आयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅंटीनमध्ये काम करणारा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीकडे असलेल्या फोनमध्ये कोणते फुटेज आहे, याबाबत आम्हाला अद्याप काहीही माहिती नाही. कँटीनला तात्काळ बंद करण्यात आले असून केवळ महिला कर्मचारी असताना ही सुरु राहणार आहे.

आयआयटी मुंबईने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आरोपीने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू. आयआयटी मुंबईचे डीन प्रोफेसर तपनेंदू कुंडू म्हणाले की, वसतिगृहाचे कँटीन पूर्वी पुरुष कर्मचारी चालवत होते. संस्थेने या प्रकरणावर त्वरित कारवाई केली आहे. आयआयटी मुंबईमधील बाथरूमकडे जाणारा रस्ता सील करण्यात आला आहे. वसतिगृह विभाग H10 चा तपास केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे.

चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरण

तत्पूर्वी चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर एमएमएस बनवणाऱ्या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होत. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती, असा आरोप आहे. या तरुणाने हे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या तरुणालाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget