Sheena Bora Murder Case : लव्ह स्टोरी ते मर्डर मिस्ट्री; शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत नेमकं काय घडलं?
Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून तब्बल साडेसहा वर्षानंतर तिला दिलासा मिळाला आहे.
Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्या प्रकरणातील (Sheena Bora Murder Case) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला (Indrani Mukerjea) जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून इंद्राणी मुखर्जीला (Peter Mukerjea) दिलासा देण्यात आला आहे. तब्बल साडेसहा वर्षानंतर मुलीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला दिलासा मिळाला आहे. याप्रकरणातील आणखी एक आरोपी पीटर मुखर्जीला यापूर्वीच कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, 2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं होतं.
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीनं वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयनं कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता.
अपहरण करुन कारमध्येच शीनाची हत्या
वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जातं. इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधारात ठेवल्याचं उघड झालं. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीनं पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं. इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजेच, इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते. त्या माय-लेकीच शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला होता.
लव्ह स्टोरी ते मुलीची मर्डर मिस्ट्री; जाणून घेऊयात शीना बोरा हत्याकांड प्रकरणी नेमकं काय घडलं?
- 2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातल्या जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळला होता. मृतदेह कुजल्यामुळं ओळख पटवणं अशक्य होतं.
- 2015 मध्ये तीन वर्षांनी हत्येचा उलगडा झाला. इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला अटक केल्यानंतर या प्रकरणाचं बिंग फुटलं.
- इंद्राणी मुखर्जीनं शीनाला वांद्रे इथं बोलावून गळा दाबून हत्या केली आणि शव रायगड जिल्ह्यात नेऊन दफन केल्याचा आरोप आहे.
- पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिच्याशी आई इंद्राणी मुखर्जीचा वाद झाला होता. आणि या वादातूनच हत्याकांडाचं षडयंत्र रचलं गेल्याचं बोललं जात आहे.
- या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी, ड्रायव्हर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी आणि पहिला पती संजीव खन्ना यालाही अटक करण्यात आली होती.
- इंद्राणीनं शीना मुलगी नसून बहीण असल्याचं भासवलं होतं. इंद्राणी मुखर्जीच्या दुसऱ्या पतीचा मुलगा राहुल मुखर्जीशी शीनाचे प्रेमसंबंध होते.
- पीटर मुखर्जी यांना 2020 मध्ये जामीन मंजूर झाला होता.
- शीना बोरा हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांचा घटस्फोट झाला होता.
- इंद्राणी मुखर्जी 2015 पासून गेली 7 वर्ष तुरुंगात होती. आज अखेर तिला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.