(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SDM Murder Case: पत्नीला संपवलं, रक्ताने माखलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले, SDM हत्याकांडात धक्कादायक खुलासा
Dindori SDM Death Case: मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यातील हत्याकांडाची थरकाप उडवणारी घडणारी घटना समोर आली आहे.
Dindori SDM Death Case: मध्य प्रदेशमधील डिंडोरी जिल्ह्यातील हत्याकांडाची थरकाप उडवणारी घडणारी घटना समोर आली आहे. नवऱ्याने SDM पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी रक्ताने माखलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले. 24 तासानंतरही या हत्याकांडात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतलेय.
डिंडोरी जिल्हातील शहपुरा येथे एसडीएम निशा नापित यांचा रविवारी मृत्यू झाला होता. 24 तासानंतर पोस्टमार्ममध्ये धक्कादायक खुलासा झाला. निशा हिचा खून झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. निशा हिला तिचा पती मनिष शर्मा याने संपवलं होतं. डीआयजी मुकेश श्रीवास्तव यांनी सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार निशाला गळा दाबून संपवलं आहे.
पुरावा मिटवण्यासाठी लढवली शक्कल -
डीआयजी मुकेश श्रीवास्तव यांनी एसडीएम हत्याकांडाबद्दल सांगितलं की, पुरावे लपवण्यासाठी मनिष शर्मा याने कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवून सुकवले होते. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि अन्य पुरावाच्या आधारावर मनिष शर्मा याला अटक केली आहे. त्याच्यावर भादवि कलम 02,304 बी आणि 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयात दाखल कऱण्याआधीच मृत्यू -
एसडीएम निशा नापित यांचा रविवारी संशयित स्थितीमध्ये मृत्यू झाला होता. एसडीएमचे पती मनिष शर्माने पोलिसांना सागितले की, छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी निशा यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केले. त्यामध्ये एसडीएम निशा यांचं नैसर्गिक निधन झालं नसून हत्या केल्याचं समोर आले.
आरोपीकडून स्पष्टीकरण -
निशा यांचं एकच मूत्रपिंड काम करत होते. त्यामुळे सतत सर्दी, खोकला राहत होता. शनिवारी त्यांचं उपवास होता. यावेळी ती पेरु खात होती. रात्री दहा वाजण्याच्या आसपास उलट्या झाल्या. त्यानंतर नाकातून रक्त येऊ लागले. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर ती झोपली होती, असे मनिष याने पोलिसांना सांगितलं होतं.
रविवारी काही काम नसते, त्यामुळे झोपेतून उठवलं नाही. दुपारी दोन वाजण्याच्या आसपास उठवायला गेलो, पण प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्यामुळे सीपीआर दिला अन् तीन वाजण्याच्या आसपास ड्रायव्हरला डॉक्टरांना घेऊन यायला सांगितलं. डॉक्टरांनी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयातही सीपीआर दिलं, असे मनिष याने पोलिसांना प्रथमदर्शी सांगितलं होतं.
एसडीएमच्या बहिणीने लावला आरोप -
या घटनेची माहिती मिळताच एसडीएम निशाची मोठी बहिण नीलिमा नापित हिने मनिष यांच्यावर आरोप केला. मनिष शर्मा याच्याकडे अनेकांचे पैसे होते, त्यामुळे निशाला त्रास होत होता. निशाला कोणतेही आजरपण नव्हते. सर्दी खोकला तर सर्वांनाच होते. मनिष शर्मा यानेच हत्या केली असेल, असे नीलिमा हिने पोलिसांना सांगितलं. एफएसएल टीमला चादर, उशी आणि निशाचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये मिळाले. म्हणजे, तो पुरावे लपवत होता, असेही नीलिमाने सांगितलं.
पती-पत्नीमध्ये वाद -
पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नॉमिनीवरुन दोघांमध्ये वाद झाला होता. निशा हिने नॉमिनीमध्ये नवऱ्याला स्थान दिले नव्हते. तिने मुलगा स्वप्नील आणि बहीण नीलिमा यांना नॉमिनी केले होते. यावरुन दोघांमध्ये वाद होत होता. यातूनच हत्या झाली असेल, असे पोलिसांना संशय आहे.