एक्स्प्लोर

Nagpur News : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटले; चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू, समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वरील घटना

Samrudhhi Highway Accident : अवैधरित्या गाईची तस्करी करणारे पीकअप वाहन समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

Samriddhi Highway Accident नागपूर : अवैधरित्या गाईची तस्करी (Cow Smuggling) करणारे पीकअप वाहन समृद्धीच्या (Samriddhi Highway) एन्ट्री पॉईंट वर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून निघालेले हे वाहन समृद्धी महामार्गावरून अवैधरित्या गाईची तस्करी करत होते.

दरम्यान, समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वर हे पीकअप वाहन आले असता अचानक हा अपघात झाला आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. हिंगणा पोलिसांनी या प्रकरणी पीकअप गाडी चालक आणि अन्य एका संशयित आरोपीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Expressway) पुन्हा गो-तस्करी होतेय का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.  

अपघातात चार गाईंचा जागीच मृत्यू  

या प्रकरणातील वाहनचालक जुबेर जान मोहम्मद कुरेशी आणि रिझवान उर्फ रिझु रौब खान दोघे ही कामठीचे रहिवासी आहेत. यात संशयित आरोपींनी पीकअप गाडीमध्ये तब्बल 13 गाई कोंबून भरल्या होत्या. त्यानंतर ते समृद्धी मार्गाने वर्धेकडे जाण्यासाठी निघाले असता समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट जवळ भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. त्यामुळे गाडीत असलेली सर्व जनावरे खाली फेकल्या गेलीत. यामध्ये 4  गाईंचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर गाईना जबर मार असल्याची माहिती समोर आली आहे.  

अपघातात गाडीचालक जखमी

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ, हवालदार अरुण इंगळे आणि इतर स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात दोन्ही संशयित आरोपी किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच मृत गाईंचा पंचनामा करण्यात आला. तर उर्वरित 9 गायींना नागपूर येथील गोरक्षण समितीकडे देण्यात आले आहे. 

 गो तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल 

या प्रकरणातील संशयित आरोपींनी 13 गायी कत्तलखान्यात नेण्यासाठी अवैधरित्या गाईची वाहतूक केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गो-तस्करांनी केला पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

नागपूरात गोवंश तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते आता पोलिसांना चिरडण्यास सुद्धा भीत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पारडी-कन्हान या मार्गावर गो-तस्कर मालवाहू वाहनाने गोवंशांना कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्यासाठी सापळा रचला होता. संशयास्पद ट्रक येताना पाहून पोलीस पथक सतर्क झाले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा आदेश दिला.  मात्र, गो तस्करी करत असलेल्या वाहन चालकाने ट्रक थांबवण्याऐवजी गती आणखी वाढवली आणि ट्रक पोलिसांच्या दिशेने घेऊन गेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस भांभावले आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, तोपर्यंत तो चालक ट्रक घेऊन पळून गेला. पोलीस या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhigwan Kidnapping Case: पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
Maharashtra ATS Action: फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग, युवकांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये धाडलं?; ATSच्या छापेमारी धक्कादायक वास्तव उघड
फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग, युवकांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये धाडलं?; ATSच्या छापेमारी धक्कादायक वास्तव उघड
Bhigwan Kidnapping Case: पाच दिवसावर लग्न, आई अन् भावावर टाकली मिरची पूड टाकत तरुणीचं अपहरण, कारवाईला वेग येताच तरुणीने व्हिडीओ शेअर केला अन्...; भिगवण प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
पाच दिवसावर लग्न, आई अन् भावावर टाकली मिरची पूड टाकत तरुणीचं अपहरण, कारवाईला वेग येताच तरुणीने व्हिडीओ शेअर केला अन्...; भिगवण प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath shinde : शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
दोन वर्षांचा चिमुकला खेळत असतानाच अनर्थ घडला, घराची भिंत अचानक अंगावर कोसळली अन्...; नाशिकमधील हृदयद्रावक घटना
Epstein Files: व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
व्यावसायिक, राजकारणी अन् बँकर्स! एपस्टीनशी संबंध उघड होताच जगभरात राजीनाम्यांची लाट सुरूच; आता आणखी एका अब्जाधीशाचा राजीनामा; आतापर्यंत 10 देशांत नाव येताच पदावर पाणी सोडलं
Bhigwan Kidnapping Case: पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Gold Silver Rates Today: सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
सोने -चांदी आवाक्याबाहेरच! पुन्हा दर वाढले, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? भाववाढीची  कारणे काय?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Rohit Pawar and Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
Embed widget