ब्रेकिंग : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम; अहवालात काय म्हटलंय?
Salman Khan Firing Case : तुरुंगात आत्महत्या केलेला आरोपी अनुज थापनच्या पर्थिवाचं पोस्टमार्टम झालं आहे. जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम पूर्ण करून मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) फायरिंग प्रकरणातील (Firing Case) मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम (Post-Mortem) करण्यात आहे. तुरुंगात आत्महत्या केलेला आरोपी अनुज थापनच्या (Anuj Thapan) पर्थिवाचं पोस्टमार्टम झालं आहे. जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम पूर्ण करून मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला आहे. जवळपास दोन तास पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू होती.
सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट
पोस्टमार्टम टीममध्ये जेजे रुग्णालयाचे पोस्ट मार्टम विभागाचे प्रमुख, एक मॅजिस्ट्रेट, पोलीस अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी यांचा समावेश होता. आरोपी अनुज थापनच्या मृतदेहाच्या संपूर्ण पोस्टमार्टम प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. स्टेट सीआयडीला पोस्टमार्टम अहवालाची प्रतिक्षा आहे.
पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा
सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी अनुजने तुरुंगातील चादर फाडून त्यानेच गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलीस कास्टडीमध्ये झालेल्या या मृत्यू प्रकरणाची एक मॅजिस्ट्रेट आणि दुसरी सीआयडी अशी दोन स्तरावर चौकशी होणार आहे. आता आरोपीच्या पोस्टमार्टम अहवालात नेमकं काय म्हटलंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गोळीबार प्रकरणात चार जणांना अटक
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेरील गोळीबार प्रकरणात (Firing Case) चार जणांना अटक करण्यात आली होती. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी पंजाबमधून आरोपी अनुज थापन याला पोलिसांनी अटक केली होती. चार-पाच पोलिसांच्या देखरेखीखाली अनुज तुरुंगामध्ये इतर 10 कैद्यांसोबत होता. 26 एप्रिल रोजी अनुजने पोलील कोठडीमध्ये असलेल्या बाथरुमध्ये तुरुंगातील चादरीच्या साहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली.
आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी
महाराष्ट्राचे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी पीके जैन यांनी सांगितलं की, तुरुंगातील कोणताही मृत्यू हा हत्या म्हणून नोंदवली जाते. पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांची गुन्हे अन्वेषण विभाग (CID) चौकशी करण्यात येईल, असंही जैन यांनी सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज थापन आत्महत्येसाठी कशामुळे प्रवृत्त झाला, यासंदर्भात तपास सुरु आहे.
गोळीबार प्रकरणाचा तपास सुरुच
14 एप्रिल रोजी अभिनेता सलमानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबारात वापरलेली शस्त्रे अनुज थापन आणि सोनू सुभाष चंदर या आरोपींनी अन्य आरोपींनी दिली होती. तुरुंगात एखाद्या व्यक्तीने आत्महत्येसाठी कोणत्याही गोष्टींचा वापर केला, यासाठी तुरुंगाचीही तपासणी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :