Crime News : बँक कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये बंद करुन 32 किलो सोनं लंपास; पोलिसांना आहे 'या' व्यक्तीवर संशय
Chennai Robbery : चेन्नई एका बँकच्या कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये कोंडून दरोडेखोरांनी कोट्यवधींचं सोनं लुटून पळ काढला.
Trending News : चेन्नई (Chennai) एका बँकच्या कर्मचाऱ्यांना (Bank Robbery) टॉयलेटमध्ये कोंडून दरोडेखोरांनी कोट्यवधींचं सोनं (Gold Robbery) लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बँकेतील 32 किलो सोनं (32 Kg Gold) लंपास केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चेन्नईतील (Chennai) अरुंबक्कम (Arumbakkam) येथील फेडबँक गोल्ड लोन ऑफीस (FedBank Gold Loan, Chennai) येथील सोन्यावर दरोडेखोरांनी हात साफ करत पळ काढला आहे. चोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना शौचालयात बंद करुन बँकेतील सोनं लंपास केलं.
या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त शंकर जिवल यांनी सांगितलं की, 'अरुंबक्कम येथील फेडबँक गोल्ड लोनवर (FedBank Gold) दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी स्ट्राँग रूमच्या चाव्या घेऊन कर्मचाऱ्यांना टॉयलेटमध्ये बंद केलं. त्यानंतर बॅगमध्ये सोने घेऊन पळ काढला. शाखा व्यवस्थापकानुसार, 32 किलो सोनं चोरीला गेलं आहे. या संदर्भात अधिक तपास सुरु आहे.'
पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, बँक चोरीत सामील दरोडेखोरांमध्ये एका बँक कर्मचारी (Bank Employee) असल्याचा पोलिसांनी संशय आहे. पोलिसांचा हा संशय खरा ठरतो की, खोटा हे येत्या काळात समोर येईल. बँकेतील सुरक्षारक्षकांनं पोलिसांना सांगितलं आहे की, दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला पेय दिलं होतं, त्यानंतर तो बेशुद्ध झाला. या संदर्भात अधिक तपास सुरु असून सध्या काहीही सांगता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथकं नेमण्यात आलं आहे.
चेन्नई शहरातील या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी 32 किलो सोनं लंपास केलं आहे. 10 ग्रॅम (10 Gram) सोन्याची किंमत 53 हजारांच्या आसपास आहे. त्यानुसार 32 किलो सोन्याची (32 Kg Gold) किंमत कोट्यवधी रुपये असून, हे सोनं घेऊन हे दरोडेखोर फरार झाले आहेत. आता या दरोडेखोरांना पोलीस कधी आणि कसं पकडतात हे पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या :
- Police For Rent : पोलिसांसोबत संपूर्ण पोलीस स्टेशन देखील भाड्याने मिळेल, जाणून घ्या भारताच्या 'या' राज्यातील अनोखा कायदा
- PM Modi : वयाच्या शंभरीतही PM मोदींच्या मातोश्रींची देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
- 75th independence day : रस्त्यावरुन जात होती तिरंगा यात्रा, वृद्ध व्यक्तीने पाहताच केला सलाम, व्हिडीओ व्हायरल