Mumbai Crime News: इमारतीच्या लिफ्टमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना, सीसीटीव्हीमध्ये सगळं कैद
Mumbai Crime News: एकाच बिल्डिंगमध्ये राहणारा 65 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच इमारतीमध्ये राहणारा 65 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून 9 वर्षीय लहान मुलीवर लैंगिक अत्याचार (Mumbai Crime News) केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं? (Retired police officer assaults minor girl)
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून थोडीही दयामाया न करता चक्क संध्याकाळी सातच्या सुमरास शेजारी राहणारे लहान मुलगी लिफ्टमधून घरी जाण्यासाठी निघाली. याच दरम्यान निवृत्त पोलीस अधिकारी यांनी लिफ्टमध्ये नववर्षीय चिमुरडीला ओडलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारची सर्व घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
आरोपीला पोलिसांकडून अटक (Mumbai Crime News)
मुलगी थेट जाऊन आपली आईशी या सर्व घटनेची माहिती देताच आईने कस्तुरबा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. तक्रारीच्या गंभीर दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीला कस्तुरबा मार्क पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले असता कोर्टामधून आरोपीला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासंदर्भात कस्तुरबा मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.
























