एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?

Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यवसायिक भागिदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पत्नीसोबत व्यवसायिक भागिदारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खलील शेख (Khalil Shaikh), असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी म्हटलं आहे. ‌

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रविंद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी चार भागिदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह खलील या बांधकाम व्यावसायिकाचा देखील समावेश होता. वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती. 

कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करतोय- (Khalil Shaikh Pune News)

वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात पोहोचलं. पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील याने गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचं खलील शेख यांनी म्हटलंय. त्याचबरोबर आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचं देखील खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले. 

आत्महत्या करण्याआधी खलील शेख व्हिडीओमध्ये काय म्हणाले? (Khalil Shaikh Pune Marathi News)

उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गावडे हे स्वतः पार्टनर आहेत. पण माझं यांचे एक बिल घेतलेलं आहे त्याचे बिलाचे पेमेंट 20 लाख रुपये आहे. परंतु ते दिलेले नाही. आणि दोन बिलं यांनी घेतलेले नाहीत. अशा त्या दोन बिलाचे पेमेंट 15-15 लाख रुपये आहे, हे 30 लाख रुपये. असे यांच्याकडून एकूण 50 लाख रुपये येणे आहे. मी तीन वर्षांनी ह्या 50 लाखांचे 4 टक्क्याने व्याज भरतोय. बाळासाहेब शेडगे माझे पैसे देत नाहीय. दादागिरी आणि भाईगिरी करत आहे. स्वतःला हा खूप मोठा माणूस समजतोय. याच्यामुळे पुढे माझ्या मुलाला पण धोका होऊ शकतोय, मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकतोय. मला पण दोन-चार वेळेस बाळासाहेब शेडगेने धमकी दिलेली आहे. फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही. किंवा तुला पुण्यात जगणं मुश्किल करीन, तुमच्या लेकराबाळाला पण जगणं मुश्किल करीन, अशा बाळासाहेब शेडगेंनी मला धमक्या दिल्या. आज मी तर फाशी घेणारच आहे. बाकी माझ्या लेकरा-बाळाला त्रास झाला तर यासाठी बाळासाहेब शेडगे आणि त्यांचा मुलगा जबाबदार असेल, असं खलील शेख म्हणाले. 

रविंद्र धंगेकर काय म्हणाले? (Ravindra Dhangekar Khalil Shaikh)

विविध कर्जजास्त झाल्यामुळे खलील शेख यांनी आत्महत्या केली.  ही जागा वक्फची आहे असं आम्हाला पत्र आलं, प्रोजेक्ट थांबवा असं सांगण्यात आलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही जी कारवाई करताय याने अनेकजण आत्महत्या करतील त्यात मी सुध्दा त्यात असेल असं ते बोलले. वक्फ बोर्डाचा आणि त्या जागेचा काही संबंध आता राहिला नाही. थांबलेल्या कामांमुळे हा प्रोजेक्टा ढासाळला, असं रविंद्र धंगेकरांनी सांगितले. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget