एक्स्प्लोर

Crime News : माणुसकीला काळीमा! गरम सळ्यांचे चटके देत बेदम मारहाण; जिवंत पुरण्यासाठी मागवला जेसीबी, सासरच्या मंडळींकडून सूनेचा 'चेटकीण' म्हणत छळ

Rajasthan Crime : सासरच्या मंडळींनी 'चेटकीण' म्हणत सुनेला छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर सूनेला गाडण्याचीही तयारी त्यांनी केली होती.

Rajasthan News : सासरच्या मंडळींकडून सुनेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी सूनेला बेदम मारहाण करत गरम सळ्यांचे चटके दिले, इतकंच नाहीतर तिला जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीही मागवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनेला चेटकीण म्हणत सासरच्या मंडळीनी छळ केल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

सासरच्या मंडळींकडून सुनेला छळ

राजस्थानमधील भिलवाडा येथील ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनेला चेटकीण म्हणत सासरच्यांनी निर्दयीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सासरच्यांनी महिलेच्या शरीरावर गरम सळ्यांने चटके दिले, तिचे दात तोडले आणि केसही कापले. यानंतर त्यांनी सूनेला गाडण्यासाठी जेसीबीही मागवला होता. पीडितेच्या वडिलांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 जून रोजी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडितेच्या वडीलांनी मुलीच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्यास वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये त्यांनी अजमेर जिल्ह्यातील एका गावात ऐपतीप्रमाणे मुलीचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून मुलीचा छळ सुरु झाला. महिलेला मारहाण करत सासरच्या मंडळींकजून हुंड्याची मागणी करण्यात आली. त्यांनी चेटकीण म्हणत सुनेचा छळ सुरु केला. सासरची मंडळी सूनेला माहेर पाठवत नव्हते आणि तिला बेदम मारहाण करायचे. लग्नानंतर एका वर्षाने महिलेने एका मुलाला जन्म दिला. पण, त्यानंतरही सूनेचा छळ सुरुच राहिला.

लग्नानंतर सासरच्यांकडून महिलेचा छळ

पीडितेच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुलीच्या लग्नावेळी ऐपतीप्रमाण हुंडा दिला होता. त्यांनी लग्नात मुलीला कूलर, टिव्हीपासून ते सोने-चांदीच्या दागिन्यांपर्यंत सर्व वस्तू दिल्या होत्या. पण त्यानंतरही सासरच्या मंडळींची हाव वाढत राहिली आणि त्यांनी महिलेचा छळ सुरु ठेवला. महिलेला मारहाण केली जात असे. सासरची मंडळी तिला चेटकीण म्हणत तिला गरम सळ्यांचे चटकेही देत असतं.

जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

पीडितेच्या वडिलांना मुलीचा छळ होत असल्याचं समजताच वडील काही लोकांसह मुलीच्या सासरच्या घरी पोहोचल. येथे महिलेची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
Kalyan Court : आयफोन एअरड्रॉपद्वारे महिला वकिलांचे खासगी फोटो अन् डेटा चोरला, रंगेहात सापडल्यावर वकिलाला बेदम चोपला, कल्याण कोर्टात राडा
आयफोन एअरड्रॉपद्वारे महिला वकिलांचे खासगी फोटो अन् डेटा चोरला, रंगेहात सापडल्यावर वकिलाला बेदम चोपला, कल्याण कोर्टात राडा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Embed widget