विकृतीचा कळस! पाच वर्षांच्या दोन मुलींवर स्कूलबसमधील क्लिनरकडून लैंगिक अत्याचार, रायगड हादरले
Raigad Crime: .नराधमाला वाचवण्यासाठी शिंदे गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात अवैध जमा गोळा करून पीडित मुलींच्या पालकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे .

Raigad crime: रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणा हद्दीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे .अवघ्या पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर स्कूलबस मधील क्लीनरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .या घटनेने संपूर्ण रायगड हादरले असून बदलापूर प्रकरणाची ही पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात आहे .कर्जतमधील वदप येथील करण दीपक पाटील या विकृताने स्कूलबस मध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार ( Raigad crime news) केल्याचे मेडिकल तपासात उघडकीस आले .याप्रकरणी आरोपीवर कर्जत पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे .(Crime News)
रायगडच्या कर्जत मधील 5 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .नराधमाला वाचवण्यासाठी शिंदे गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात अवैध जमा गोळा करून पीडित मुलींच्या पालकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे .
नक्की घडले काय?
रायगडच्या कर्जतमध्ये पाच वर्षांच्या दोन मुलींवर शाळेच्या बसमध्ये विकृत क्लिनर ने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे . कर्जतमधील वदप येथील करण दीपक पाटील असे या नराधमाचे नाव आहे .स्कूल बस मध्येच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलींच्या मेडिकल तपासात उघडकीस आले असून याप्रकरणी बस क्लीनरला कर्जत पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे .या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .आपल्या मुलींना शाळेत पाठवायचं का नाही? असा सवाल पालकांकडून केला जात आहे .
बसमालकाची चौकशी करण्याची मागणी
दरम्यान अवघ्या पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार करणारा स्कूलबसमधील क्लिनरला वाचवण्यासाठी शिंद गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात अवैध जमाव गोळा करून पीडित मुलीच्या पालकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईने केला आहे .त्यामुळे या सरपंचावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून जोर धरत आहे .याशिवाय बस मालक कमलेश ठाकरे याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी पिढी त्याच्या आईने केली आहे .या संपूर्ण घटनेमुळे बदलापूर अत्याचार प्रकरणाची ही पुनरावृत्ती असल्याचे सांगितले जात आहे .या प्रकरणात आता नक्की काय कारवाई होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे .
हेही वाचा:























