एक्स्प्लोर

Puttewar Murder Case : पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरणात एसीबीची एंट्री; अर्चना पुट्टेवारांच्या संपत्तीची होणार चौकशी 

Puttewar Murder Case: अपघाताच्या माध्यमातून सासऱ्याची हत्या घडवणारी सून आणि नगर रचना विभागाततील वरिष्ठ अधिकारी अर्चना पुट्टेवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Nagpur Purushottam Puttewar Murder Case नागपूर : अपघाताच्या माध्यमातून सासऱ्याची हत्या घडवणारी सून आणि नगर रचना विभागाततील वरिष्ठ अधिकारी अर्चना पुट्टेवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) अर्चना पुट्टेवार यांच्या संपत्तीची तसेच अधिकारी म्हणून केलेल्या बेकायदेशीर कृतीची चौकशी करणार आहे. अँटी करप्शन ब्युरोला गडचिरोली जिल्ह्यातून म्हणजेच जिथे अर्चना पुट्टेवार कार्यरत आहे तेथून एक तक्रार मिळाली आहे. त्यात नगररचना विभागाच्या अधिकारी म्हणून अर्चना पुट्टेवार यांनी अनेक बेकायदेशीर काम केली आहेत. त्यामुळे त्यांच्या बेकायदेशीर कामांची आणि संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीमधून करण्यात आली आहे.

त्यानंतर आता अँटी करप्शन ब्युरोने अर्चना पुट्टेवार यांच्या चौकशीसाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे या हत्येच्या प्रकरणामुळे अर्चना पुट्टेवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असून या तपासाअंती आणखी काही नवी माहिती पुढे येते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकरणात एसीबीची एंट्री

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना आणि मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रविणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरू केला होता. त्यानंतर संपत्तीत वाटा मिळावा, यासाठी योगिता पार्लेवार यांनी वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मदतीने न्यायालयात खटला दाखल केला. त्यामुळे अर्चना व तिचा भाऊ सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाचा संचालक (एमएसएमई) प्रशांत पार्लेवार हे दोघे दुखावले. या दोघांनी पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट आखला. 

अर्चना पुट्टेवारांच्या संपत्तीची होणार चौकशी 

पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनीही अपघाती मृत्यूचीच नोंद केली होती. मात्र, नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीने घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती मिळाली. पुट्टेवार यांच्या अपघातातून (Nagpur Accident) हत्येच्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड निघाली आहे. अर्चना पुट्टेवार यांनीच आपल्या 82 वर्षीय सासर्‍यांच्या हत्येची सुपारी कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेचे माध्यमातून दिल्याचं पोलीस तपासात पुढे आलय. वाहनचालक सार्थक बागडेने या प्रकरणी नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना पुरुषोत्तम पुट्टेवार यांची अपघातातून हत्या करण्याच्या काम सोपवलं होतं.

अर्चना पुट्टेवार यांच्या अडचणीत आणखी वाढ  

याप्रकरणी पोलिसांनी अर्चना, प्रशांतसह सातही आरोपींना अटक केली. सध्या सर्वजण कारागृहात आहेत. अर्चनाने मोठी संपत्ती जमविली असून, यात गडचिरोलीतील दोघांची महत्त्वाची भूमिका असल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी एसीबीकडे संपत्तीच्या चौकशीसाठी पत्र पाठविण्याची तयारी सुरू केली असतानाच गडचिरोली एसीबीकडे अर्चना आणि तिच्या दोन विश्वासूंच्या संपत्तीची आणि अनियमिततेची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आली. ही तक्रार एसीबीकडे करण्यात आली आहे. ती महासंचालक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली असून महासंचालक कार्यालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती एसीबीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget