एक्स्प्लोर

पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार

पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर ॲसिड हल्ला केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे (Pune) शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. मारहाण, हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी पुणे शहर हादरलं असतानाच, आता बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. पैशाच्या वादातून वडिलांनीच चक्क मुलाच्या अंगावर घरातील स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ॲसिड फेकल्याची घटना कोथरूडमधील केळेवाडी येथे घडली आहे. या घटनेत मुलाला डोळा आणि चेहऱ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणात, पोलिसांनी (Crime news) वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर ॲसिड हल्ला केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वडील पसार झाले आहेत, या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. तुषार शाम कदम (वय 30) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तुषारने कोथरूड पोलिसांत वडिलांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तुषार 14 मे रोजी घरात झोपला असताना, त्याचा पैशावरुन वडिलांसोबत वाद झाला होता. दोघांमधील वाद टोकाला गेल्याने वडिलांनी स्वच्छतागृहात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ॲसिडची बाटलीच मुलाच्या अंगावर फेकली, त्यात मुलगा तुषारच्या चेहऱ्यावर बाटलीतील द्रव्य पडल्याने मुलगा जखमी झाला आहे. त्यानंतर, त्याला खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले असून पोलिसातही तक्रार देण्यात आली. याप्रकरणी, अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत. 

हेही वाचा

दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget