Pune Accident : बारावीचा निकाल सेलिब्रेट केला, पबमध्ये दारू प्यायली अन् नशेतच गाडी चालवली; वेदांत अग्रवालचा दारू पितानाचा CCTV समोर
Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर अपघातातातील दोघांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेला वेदांत अग्रवालने त्या दिवशी दोन पबमध्ये दारू पिल्याचं स्पष्ट झालंय.
पुणे: भरधाव कारने दोघांना धडक देऊन (Pune Porsche Car Accident) त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विशाल अग्रवालच्या मुलाचा (Son Of Pune Builder Vishal Agarwal) घटनेआधी दारू पितानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला होता. आता पोलिस तपासात हा सीसीटीव्ही उघड झाला आहे.
बारावीचा निकाल सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते
विशाल अग्रवाल या पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल हा घटनेच्या आधी एका पबमधे दारु पिताना दिसतोय. कोझी किचन असं या हॉटेलचं नाव असून हा मुलगा अल्पवयीन असून त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्रही अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. या अल्पवयीन मुलांना पबमध्ये दारु पिण्यासाठी दिली. बारावीच्या निकालाची पार्टी करण्यासाठी हे सगळे कोझी किचन हॉटलेलमधे गेले होते. या हॉटेलमधे दारु पिल्यावर ते ब्लक या आणखी एका बारमधे गेले.
दारूच्या नशेत गाडी चालवली
तिथून बाहेर पडल्यावर दारुच्या नशेत असलेला हा अल्पवयीन मुलगा कार चालवायला स्टिअरिंगवर बसला आणि समोरुन निघालेल्या दुचाकीला त्याने धडक दिली. या धडकेतच दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन्ही बार आणि पब मालक आणि चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा (रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण-तरुणीला चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आता पोलिसांनीसुद्धा वेदांत अग्रवालने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवल्याचे स्पष्ट असल्याचे सांगितले.
आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला आहे. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी अबकारी विभागासासोबत काम करण्यात येईल असं पोलिसांकडून सागंण्यात आलं.
कारला नंबरप्लेट नव्हती
अंनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे दोघेही आयटी अभियंते होते. हे दोघे आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन घरी चालले होते. पण वेदांत अग्रवालच्या भरधाव वेगानं त्यांना अक्षरश: चिरडलं . धक्कादायक म्हणजे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आरोपीच्या कारलाना पुढे नंबर प्लेट होती ना मागे. वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या आणि नंबरप्लेट नसलेल्या या कारची किंमत तब्बल अडीच कोटी आहे. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक पोर्शे स्पोर्ट्स कारची किंमत तब्बल अडीच कोटी आहे . 260 किलोमीटर प्रतितास इतका तिचा वेग आहे. फक्त 2.6 सेकंदात ही कार 100 किलोमीटरचा वेग पकडते .
ही बातमी वाचा: