एक्स्प्लोर

मोठी बातमी : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार, दोन तास चौकशीसाठी परवानगी

Pune Car Accident : पुणे पोलिसांना अल्पवयीन तरुणाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. गुन्हे शाखेकडून शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे.

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस (Pune Police) आता अल्पवयीन मुलाची चौकशी (Enquiry) करणार आहे. पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांना बाल हक्क न्याय मंडळाकडून (Juvenile Justice Board) अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्यात येणार आहे. पालक उपलब्ध नसल्याने बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्याच्या उपस्थितीत गुन्हे शाखेकडून ही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार

पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच उद्या अल्पवयीन मुलाचीची चौकशी करणार आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने दोघांना भरधाव पोर्शे कारने चिरडलं होतं. अपघातानंतर अल्पवयीन मुलाची कोणतीही चौकशी झाली नव्हती किंवा कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना चौकशीसाठी परवानगी दिली आहे.

अल्पवयीन मुलाची दोन तास चौकशीसाठी परवानगी

पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीम दोन तास अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले होते, मात्र अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. आता बाल हक्क न्याय मंडळाच्या परवानगीनंतर पुणे क्राईम ब्रांचची टीम बालसुधारगृहात जाऊन अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहेत. दोन तास चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

बाल हक्क न्याय मंडळाचा सदस्य चौकशी वेळी उपस्थित

या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाला घटनेसंबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. बाल हक्क न्याय मंडळाचा एक सदस्य चौकशीच्या वेळी उपस्थित असतील. न्यायालयाने अल्पवयीन मुलाच्या पालकांना उपस्थित राहण्यास सांगितल आहे. मात्र, अल्पवयीन मुलाचे वडील कोठडीत आहेत आणि आई अज्ञातवासात आहे. अल्पवयीन मुलाच्या भावाला देखील पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, अल्पवयीन मुलाचे कुटुंबिय चौकशीसाठी उपस्थित राहिले नाही, तरी बाल हक्क न्याय मंडळाचे सदस्य या चौकशीच्या वेळी उपस्थित राहतील आणि शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाची चौकशी पार पडणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Embed widget