एक्स्प्लोर

Mumbai Accident: मुंबईतही पुण्यासारखाच अपघात; 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एकाला उडवलं; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mumbai Road Accident News: मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. यात तरुण दगावल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Road Accident News: मुंबई : पुण्यातील हिट अँड रन (Pune Porsche Car Accident) प्रकरण सध्या चर्चेत आहे. या अपघातात अल्पवयीन आरोपीनं पोर्शे गाडीखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यानंतर आरोपीला मिळालेला जामीन यांमुळे हे प्रकरण संपूर्ण देशभरात पोहोचलं. अशातच आता विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याप्रमाणेच (Pune News) राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai Accident) अपघात झाला आहे. या अपघातात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईतील माझगाव परिसरात एका अल्पवयीन मुलानं दुचाकीनं एका 32 वर्षीय तरुणाला धडक दिली आहे. दुचाकीच्या धडकेत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एक 15 वर्षांचा मुलगा बाईक चालवत होता आणि त्यानं 32 वर्षांच्या माणसाला धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत इरफान नवाब अली शेख नावाचा व्यक्ती गंभीर झाला. अपघातानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भायखळा येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

मुंबईत अल्पवयीन दुचाकीच्या धडकेनं एका व्यक्तीचा मृत्यू 

मुंबईत रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. जेजे मार्ग पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याचे वडील जावेद शफीक अहमद शेख यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 3, 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्यात अल्पवयीन मुलानं पोर्शे कारनं दोघांना चिरडलं 

पुण्यात रविवारी (19 मे) एका 17 वर्षाच्या मुलानं दुचाकीवरून जाणाऱ्या दोन इंजिनिअर्सना त्याच्या पोर्शे कारनं चिरडलं होतं. कार चालवणारा अल्पवयीन दारूच्या नशेत होता. या भीषण रस्ते अपघातात दोन्ही इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (24 वर्ष) आणि अश्विनी कोष्टा (24 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. या प्रकरणात बाल न्याय मंडळानं अल्पवयीन आरोपीला काही अटींसह सोडलं होतं. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा हा मुलगा असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रलवालला अटक करण्यात आली आहे.                        

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget