एक्स्प्लोर

Pune MNS Samir Thigale : धक्कादायक! पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार

Pune News: पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (MNS District President Sameer Thigale) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला.

Pune MNS Samir Thigale : पुण्याचे मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला आहे. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत. 

नक्की काय घडलं?

गुंडानी समीर यांना धमकी दिली. त्यासोबतच पैशाची मागणीदेखील केली. "मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला", असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे. 

कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण

कुख्यात गुंडाने समीर यांच्या दिशेनं गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला. यावेळी समीर थिगळे यांचं कुटुंब घटनास्थळी हजर होतं. गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची जबाबदारी

मागील काही वर्षांपासून समीर हे मनसेत कार्यरत आहे. पक्षाच्या कामात ते चांगलेच सक्रिय आहेत. त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं होतं. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. पुण्यात आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील मनसे सक्रीय होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीही करण्यात आली आहे. मात्र, समीर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
Embed widget