एक्स्प्लोर

Pune News : पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक; दुबई कनेक्शन उघड

Pune Cyber Crime Case Updates : या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे.

Pune Cyber Crime Case : पुणे शहरात ऑनलाईन गेमिंग आणि सट्टा लावून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या हायटेक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसर (Hadapsar), फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरात पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून हे बनावट कॉल सेंटर (Fake Call Center) उद्ध्वस्त केले. या रॅकेटचे थेट 'दुबई कनेक्शन' (Dubai Connection) समोर आलं असून, पोलीस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

मुंढवा पोलीस आणि सायबर विभागाच्या (Cyber Crime Cell) संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात होती.

Fake Call Center Modus Operandi : अशी व्हायची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका इमारतीमध्ये हे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना फोन करून 'ऑनलाईन गेम' खेळून घरबसल्या लाखो रुपये कमावता येतील, असे आमिष दाखवायचे.

विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला लोकांना गेम खेळून जिंकलेले काही पैसे दिले जायचे. मात्र, एकदा का संबंधित व्यक्ती मोठी रक्कम लावून गेम हरली की, कॉल सेंटरमधून पुन्हा फोन करून 'पैसे जिंकण्याची आणखी एक सुवर्णसंधी आहे' असं भासवलं जायचं. एकदा का ती व्यक्ती जाळ्यात अडकली की, त्याला विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून त्याची संपूर्ण फसवणूक केली जात असे.

अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने त्याच्याकडे काम करणाऱ्या निष्पाप कर्मचाऱ्यांची शासकीय ओळखपत्रे गोळा केली होती. त्यांचा गैरवापर करून त्यांच्याच नावे शेकडो सिम कार्ड्स आणि बनावट बँक खाती (Mule Accounts) उघडण्यात आली होती, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये.

Call Center Arrests and Seizures : दोन जणांना अटक

या रॅकेटची माहिती मिळताच पोलिसांनी गुप्त सापळा रचून या कॉल सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतोष दत्ता वेंजणेकर आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत.

छापेमारी दरम्यान पोलिसांनी कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये लॅपटॉप, हार्ड डिस्क, ऑटो डायलर मशीन (Auto Dialer), शेकडो सिम कार्ड्स, विविध कंपन्यांचे बनावट शिक्के, बँक पासबुक आणि चेक बुक्स जप्त करण्यात आली आहेत.

Pune Call Center Dubai Connection : मुख्य सूत्रधार दुबईत सक्रिय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा दुबईत बसून या हालचाली नियंत्रित करत असल्याचे समोर आलं आहे. भारतातून जमा होणारा सर्व पैसा हवाला किंवा डिजिटल माध्यमातून हाताळण्यासाठी त्याचा एक खास सहकारी इतर आर्थिक व्यवहार पाहत होता. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलिस (Mundhwa Police Station) करत असून, नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाईन गेमिंग आणि पैशांचे आमिष दाखवणाऱ्या फोन कॉल्सला बळी पडू नये, असे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.

ही बातमी वाचा:

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget