Pune Crime: पुण्यात काय चाललंय काय ?तुफान हाणामारी, मद्यधुंद तरुणांचा नंगानाच, तोडफोड, कोयता हल्ला, 4 घटनांनी मोठी खळबळ
रस्त्याच्या मधोमध चारचाकी उभी करत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर किरकोळ कारणावरून मारहाणीच्या चार घटना लागोपाठ उघडकीस आल्या आहेत.

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारी घटनांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाहीये .आधीच स्वारगेटसारख्या मुख्य बस डेपोत झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय .त्यात किरकोळ कारणांवरून तुफान हाणामारी , मद्यधुंद तरुणांचा नंगानाच ,सिंहगड परिसरातील दांपत्यावर झालेला कोयताने हल्ला ,वाहनांची तोडफोड अशा चारही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासन नक्की करतंय काय? असा सवाल केला जाऊ लागलाय . पुणे -नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात दारूच्या नशेत भर चौकात तरुणांनी रस्त्याच्या मधोमध चारचाकी उभी करत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर किरकोळ कारणावरून मारहाणीच्या चार घटना लागोपाठ उघडकीस आल्या आहेत. (Pune Crime)
कोल्ड्रिंकच्या मालकाला रात्रीतून मारहाण, CCTV व्हायरल
पुण्यात दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून तहूरा भागातील ज्यूस विक्रेत्याला टोळक्याकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे .मारहाणीनंतर टोळक्याने तहुरा विक्रेत्याच्या गाडीचेसुद्धा नुकसान केले .मोमीनपुरा येथील प्रसिद्ध तहूरा कोल्ड्रिंग च्या मालकाला काल रात्री मारहाण केल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू आहे .ही मारहाण नेमकी कशामुळे झाली हे समजू शकलेले नाही . दोन दिवसांपूर्वीची ही घटना असून या घटनेचा सीसीटीव्ही आता वायरल होतोय .
सिंहगड रोड परिसरात दांपत्यावर कोयत्याने हल्ला
काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड परिसरात कामावरून घरी परतणाऱ्या एका दाम्पत्याचा किरकोळ कारणावरून काही तरुणांसोबत वाद झाला .या वादा नंतर त्या तरुणांनी दांपत्याला शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला केला .या घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले .घाबरलेल्या दांपत्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली .त्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे .पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .
रिक्षा चालक नागरिकांमध्ये तुफान हाणामारी
कोथरूड परिसरात एमआयटी कॉलेज जवळ रिक्षाचालक आणि नागरिकांमध्ये तुफान हाणामारी झाली .गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे .कोथरूड मध्ये एका तरुणाला गुंड गजा मारण्याच्या गुंडांनी मारहाण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली .दुसरीकडे कोथरूडमध्ये नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे .दरम्यान एमआयटी कॉलेज जवळ रिक्षा चालक आणि नागरिकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं सीसीटीव्ही वायरल होतोय .त्यामुळे या गुन्हेगारांना कोण अभय देताय असा सवाल विचारला जातोय .किरकोळ कारणावरून होणारे राडे थांबणार कधी असा संतप्त सवाल पुण्यातील नागरिक विचारत आहेत .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

