(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Pune Crime : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Pune Crime : पुणे : पुण्यात (Pune Crime) घडलेल्या एका खळबळजनक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. पुण्यात एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सध्या सुरू आहे. पत्नीचा प्रियकरासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापलेल्या पतीनं साथीदारासह कट रचला आणि पत्नीच्या प्रियकराला यमसदनी धाडलं.
पत्नीच्या प्रियकराला संपवलं
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजीव कुमार आणि धीरज कुमार यांना अटक केली आहे. राजीव कुमार हे बिहारमध्ये शिक्षक असून त्यांचा पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या तणावातून राजीवनं ही घटना घडवून आणली. दरम्यान, राजीव कुमार यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराचा व्हायरल झालेला फोटो एकत्र पाहिला होता. प्रवीणकुमार महतो असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांकडून दोघांना अटक
याबाबत एसीपी सुनील कुराडे यांनी बोलताना सांगितलं की, ही हत्या धारदार शस्त्रानं करण्यात आली आहे. खून केल्यानंतर दोन्ही आरोपी मुंबईला पळून जात होते. वाटेत त्यांना कल्याण पोलिसांनी पकडलं. राजीव कुमार हा बिहारमधील एका सरकारी शाळेत शिक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या गुन्ह्याची कबुली देताना आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रवीणकुमार झोपेत असताना त्याच्या मानेवर धारदार शस्त्रानं वार करून आरोपीनं पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :