एक्स्प्लोर

Pune Crime News : आधी विषप्रयोग, मग सुपारी दिली; पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे

Pune Crime News : विशेष म्हणजे या महिलेने आधी पतीवर विषप्रयोग केला होता, मात्र त्यात यश मिळाले नसल्याने तिने हत्येसाठी सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. 

Pune Crime News : पिंपरी- चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) आकुर्डीमध्ये पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी (Murder) सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ ही मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास दिला जात होता. सोबतच, पती दुसरे लग्न करण्याची तयारीत असल्याचा सुगावा पत्नीला लागल्याने तिने हे कृत्य केल्याचे उघड झालंय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेने आधी पतीवर विषप्रयोग केला होता, मात्र त्यात यश मिळाले नसल्याने तिने हत्येसाठी सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. 

पतीला वंशाला दिवा हवा होता, पण सलग आठ मुली जन्मल्या. त्यामुळे पती चांगलाच संतापला होता. तो सातत्याने पत्नीवर चिडचिड करायचा, वाद घालायचा. त्यामुळे, पत्नी चांगलीच वैतागली होती. त्यामुळे तीने पतीचा कायमचा बंदोबस्त लावायचं ठरवलं. यासाठी सुरवातीला पतीवर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. त्यानंतर तीने शेजारीच राहणाऱ्या शिवम दुबे आणि अमन पुजारी यांना पाच लाखांची सुपारी दिली. यावेळी दोन लाख रुपये रोख देखील दिले. त्यानंतर त्या दोघांनी पतीवर हल्ला केला. मात्र, त्यात देखील गंभीर जखमी झालेला पती वाचला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता या सर्व प्रकरणात जखमी व्यक्तीची पत्नीच मास्टरमाईंड निघाली. त्यामुळे पतीलाही धक्का बसला. 

आईनेच वडिलांची सुपारी दिल्याची मुलीला पुसटशी कल्पना नव्हती...

आरोपी महिलेकडून सुपारी घेतल्यावर शिवम दुबे आणि अमन पुजारी यांनी तिच्या पतीवर हल्ला केला. यावेळी त्यांना त्याची हत्या करायची होती, पण त्यातही तो वाचला. दरम्यान, वडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुलीने याबाबत निगडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. मात्र, वडिलांवरील या हल्ल्यामागे आईचाच हात असेल याची तिला पुसटशी कल्पना ही नव्हती. पुढे तपासाची चक्र हलली अन् निगडी पोलिसांनी आठ तासांच्या आत गुन्हेगारांना अटक केली. त्यानंतर, पोलिसी खाक्या दाखवतातच आरोपींनी या मागील सुत्रधाराचे नाव सांगून टाकले. तेंव्हा पत्नीनेच ही सुपारी दिल्याचे समोर आले. त्यानुसार निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

पहिल्यांदा विष प्रयोग केला... 

आठही मुली झाल्याने आरोपी महिलेचा पती तिला नेहमी त्रास देत होता. वंशाला दिवा हवा असे म्हणत तो पत्नीला सतत टोमणे द्यायचा. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या सर्व रोजच्या वादाला महिला वैतागली होती. अनेकदा समजावून सांगून देखील पतीचा त्रास काही थांबत नव्हता. त्यामुळे शेवटी तिने पतीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पहिल्यांदा तिने पतीवर विष प्रयोग केला. पण सुदैवाने त्यात तो वाचला. त्यामुळे तिने दुसऱ्यांदा पतीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेजारी राहणाऱ्या दोघांना पाच लाखांची सुपारी दिली. पण 'जाको राखे साइयां, मार सके ना कोई' याप्रमाणे पती दुसऱ्यांदा देखील वाचला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed Crime News : गावातील प्रेमप्रकरण, दोघेही लॉजवर गेले अन् भयंकर घडलं; तिला संपवून त्याने स्वतःलाही संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणाNana Patole Bhandara : नाना पटोलेंची लाडकी लेक निवडणूक प्रचारातPraniti Shinde Kolhapur : लाव रे तो व्हिडिओ म्हणत प्रणिती शिंदेंचा महाडिकांवर घणाघातMVA Manifesto : मविआचा जाहीरनामा 'एबीपी माझा' च्या हाती, 'शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
अडीच वर्ष झोपले...? सिंचन घोटाळ्याच्या 'त्या' आरोपावरून गिरीश महाजनांनी जयंत पाटलांना डिवचलं
US Election 2024 : डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
डोनाल्ड्र ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता, तब्बल 312 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व; सात महत्वाच्या राज्यांमध्येही दणदणीत विजय
Amit Shah: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले; शरद पवारांनाही प्रश्न विचारले!
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
BJP Manifesto : भाजपच्या संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस; जाहीरनाम्याची A to Z माहिती, एका क्लिकवर
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं प्रकरण काय?
बॉयफ्रेंडसोबत मिळून मित्राचे 300 तुकडे, हत्या करुन शॉपिंगला गेली प्रसिद्ध अभिनेत्री, हिला ओळखलंत का?
Amit Shah on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
उद्धव ठाकरे सोबत येणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दोन वाक्यात उत्तर!
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
Embed widget