एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्याच्या मुठा नदीतील त्या मृतदेहाचं गूढ उकलेना; पोलिसांना क्लू सापडेना, तपासासाठी आकाशात ड्रोन फिरवला

Pune Crime News: एका महिलेचा निर्घृण खून करून हात, पाय छाटून हा मृतदेह नेमका कोणी आणि कधी नदीत टाकला हे अजूनही समजू शकलेले नाही.

पुणे: पुण्यात चार दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीत एका तरूणीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून आली आहे. चार दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीत वाहून आलेल्या त्या मृतदेहाचं गुढ अजूनही उकलेले नाही. सोमवारी दुपारी पुण्यातील खराडी परिसरातून वाहत असलेल्या मुठा नदीच्या तिरावर एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह (Pune Crime News) आढळून आला होता. एका महिलेचा निर्घृण खून करून हात, पाय छाटून हा मृतदेह नेमका कोणी आणि कधी नदीत टाकला हे अजूनही समजू शकलेले नाही. 

पुणे पोलिसांकडून देखील या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात ड्रोनच्या साहाय्याने मदत घेतली जाते आहे. याशिवाय गेल्या 4 दिवसांपासून पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात सुद्धा बेपत्ता झालेल्या महिलांचा सुद्धा तपास या अनुषंगाने केला जातोय. पुणे पोलिसांकडून या मृतदेहाचे (Pune Crime News) इतर भाग शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. 

या प्रकरणात अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केल्याची माहिती मिळत आहे. तर मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी विकृत आरोपीने तरूणीच्या धडापासून तिचे हात-पाय आणि डोकं वेगळं केलं आहे. धारदार शस्त्राच्या सहाय्याने आरोपीने तरूणीचे अवयव कापून तिचे धड नदीपात्रात फेकून दिले असल्याची माहिती मिळत आहे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पोलिसांनी या घटनेबाबत वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात इसमाने तरूणीला ठार (Pune Crime News) मारून याबाबत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय धारदार शस्त्राच्या सहाय्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड (Pune Crime News) मुळा-मुठा नदीपात्रात फेकून दिले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. या परिसराच्या जवळच असलेल्या नदीपात्रामध्ये एका तरूणीचे हात, पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड (Pune Crime News) असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुण्यातील इंद्रयणी नदीत महिलेची उडी घेऊन आत्महत्या

काल(गुरूवारी) आळंदी येथे एका महिलेने इंद्रायणी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. या महिलेने आत्महत्या का केली, ती कोण होती याबाबत पोलिस तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
Embed widget