धक्कादायक! मटणाची भाजी का बनवली नाही? पत्नीला मारहाण, पतीविरोधात गुन्हा
Pune Crime News : शुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
Pune Crime News : महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना आपण रोज ऐकतो, वाचतो. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुक्रवार असल्याने मेजवाणीचा बेत आखण्यासाठी पतीने मटण आणले होते. मात्र, पत्नीने ते बनवलेच नाही. यामुळे उपाशी राहिलेल्या पतीला राग अनावर आला. त्यानंतर त्यानं चक्क पत्नीला लाथाबुक्यांनी मारत सुरीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुल्लक कारणावरुन पतीने पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मटणाचा स्वयंपाक करून दिला नाही म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वाघोली (Pune Wagholi) येथील हनुमान गल्लीत शुक्रवारी हा प्रकार घडला. लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) या प्रकरणी पती कैलास गंगाराम धिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दिंडे पती पत्नी वाघोलीतील हनुमान गल्ली येथे राहतात. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी पती कैलास दिंडे यांनी पत्नीकडे मटण आणून स्वयंपाक करून देण्याची मागणी केली. परंतु पत्नीने मात्र त्याच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. पत्नी आपले ऐकत नाही, म्हटल्यावर कैलास धिंडे याला राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. इतकच नाही तर स्वयंपाक घरातील सूरी आणू पत्नीच्या उजव्या हाताच्या तळव्याला दुखापत केली. तू इथे राहिली तर तुला बघून घेईल अशी म्हणून धमकी दिली. (Pune Crime News )
दरम्यान या सर्व प्रकारानंतर पत्नीने लोणीकंद पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कैलास गंगाराम धिंडे यांना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस (Pune Police) याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live