शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती
![शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले PSI Arrested red-handed while accepting a bribe of 20 thousand from a farmer in latur; ACB picked up the police along with PSI शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/07/7e683e4e38b19d09b7d87302a6bd0cf617177665720801002_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : शेतकऱ्याची पोरं जेव्हा स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनतात, तेव्हा शेतकऱ्यांसोबत त्यांनी चांगलं वागलं पाहिजे, बळीराजासाठी आपल्या पद व अधिकाराचा वापर करुन जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी सर्वांची धारणा असते. मात्र, अनेकदा शेतकऱ्यांकडेच लाच मागितली जाते, तेव्हा तीव्र संताप आल्याशिवाय राहत नाही. बळीराजाला (Farmer) देशाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा म्हणून गौरवले जाते. मात्र, त्याच अन्नदात्याकडे लाच मागितल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतातील बांधावरुन झालेल्या भांडणात गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली होती. मात्र, लाल लुचपत अधिकाऱ्यांनी (ACB) या पीएसआयला रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेननंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20,000 लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारास तहसील कार्यालयाच्या प्रागंणातून रंगेहाथ पकडले. तर, याप्रकरणी पोलीस उप निरीक्षकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
शेतीतील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण होऊन चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून 25,000 रूपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाललुचपत प्रतिबंधक विभागाने पांडुरंग दिगंबर दाडगे, (वय 43वर्षे), पद पोलीस हवालदार बं न.1545, वर्ग-3, नेमणूक पोलीस स्टेशन चाकूर आणि दिलीप रघुत्तमराव मोरे, (वय 33 वर्ष), पद- पोलीस उपनिरीक्षक, वर्ग 2, (अराजपत्रित), नेमणूक- पोलीस स्टेशन चाकूर अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून लाचेच्या रकमेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून या घनटेमुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर लाचखोरीचा डाग लागलाय.
हेही वाचा
जालन्यातील धक्कादायक घटना, 5 वर्षीय चिमुकल्यास गळफास देऊन आईनेही संपविले जीवन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)