धक्कादायक! रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड, अश्लील चाळे करत नराधमाचा लगड करण्याचा प्रयत्न; आसनगावमधील घटना
Asangaon Molestation Case : नर्स रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहत असताना नराधमाने अश्लील चाळे करत तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला.
आसनगाव : नर्सची छेडछाड केल्याची घटना आसनगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सची आसनगाव रेल्वे स्थानकावर छेड काढण्यात आली. नर्सला पाहून रेल्वे स्टेशवरच नराधमाने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्सशी नराधमाने लगड करण्याचा प्रयत्न केला. निलेश अरुण गायकवाड असं नराधमाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या.
आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड
नर्स रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहत असताना नराधमाने अश्लील चाळे करत तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने तत्काळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क केला. खाजगी रुग्णालयामध्ये नर्स पदावर कार्यरत असलेल्या 21 वर्षीय नर्ससोबत आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित नर्स आसनगावहून टिटवाळ्याला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात असताना नराधमाने आसनगाव रेल्वे स्टेशवरच नर्ससोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. नराधमाने तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अश्लील चाळे करत नराधमाचा लगड करण्याचा प्रयत्न
नर्स टिटवाळ्याला जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 2 वर लोकलची वाट पाहत होती, यावेळी ही घटना घडली आहे. ट्रेनची वाट पाहत असलेल्या नर्सला नराधमाने अश्लील हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न केला. आरोपी निलेश अरुण गायकवाड या नराधमाने नर्ससोबत आक्षेपार्ह वर्तन केला. आता महिला रेल्वे स्थानकावरही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या.
आसनगाव रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक घटना
वेळीच लोहमार्ग पोलिस मदतीला धावल्याने त्या तरुणीची सुटका झाली. मात्र, रेल्वे स्थानकावर तरुणीची छेड काढल्याच्या या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच रेल्वे स्थानकावर अशा प्रकारची घटना घडणे अतिशय संतापजनक प्रकार आहे. एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणा देणाऱ्या समाजात दुसरीकडे अशा घटना घडत असतील, तर महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविक आहे. महिलांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पायात जोडवे, हातात बांगड्या, अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे एकच खळबळ; शेताच्या बांधावर भीषण कृत्य!