Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: एक तरुणी दोन मुलांसोबत खोलीत आढळली अन्...; प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन्ही आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case) मुलगा राम पूर्णेकरने पोलिसांना दिलेल्या जबाबातून गंभीर दावे समोर आले आहेत.
हत्येपूर्वी परिसरातील एका तरुणीला दोन मुलांसोबत एका खोलीत आढळून आल्याचा आणि प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांनी याविरोधात आवाज उठवत संबंधितांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणल्याचा दावा जबाबात करण्यात आला आहे. तसेच, हत्येपूर्वी आणि हत्येनंतरही ही तरुणी पूर्णेकर यांच्या कार्यालयाबाहेर दिसून आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित तरुणीचीही चौकशी करून या दिशेने तपास करण्याची मागणी पोलिसांना दिलेल्या जबाबात करण्यात आली आहे. राम पूर्णेकरांच्या या खळबळजनक दाव्यानंतर या तरूणीला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे.
पूर्णेकर प्रकरणातील दोन्ही आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी- (Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन्ही आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश पवार आणि निखिल यादव या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोव्याला पळ काढताला गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली. पप्या शिंदेला याआधीच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण पाचपैकी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. टल्ली नावाचा मुख्य आरोपी आणि ज्याची ओळख पटली नाही असा आरोपी मोकाट आहे.
5 कोटी ठरले, कट शिजवून पूर्णेकरांना संपवलं, सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा- (Sushma Andhare On Pradeep Purnekar Case)
सुषमा अंधारे यांनी ठाण्यातून पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप आणि दावे केले. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे, टल्ल्या हे सगळे पवार नगर इथे भेटले होते. या लोकांच्या संदर्भात काय ती माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पाच कोटींचा व्यवहार झाला आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली, असा खळबळजनक दावाही सुषमा अंधारेंनी केला. मीनाक्षी शिंदे राजा शिंदे टल्ल्या हे सगळे पवार नगर इथे भेटले होते. या लोकांच्या संदर्भात काय ती माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पाच कोटींचा व्यवहार झाला आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. पंधरा दिवसापासून रेकी सुरू होती. हॉटेल महाराजाचे cctv फुटेज काढा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. मीनाक्षी शिंदे उजळ माथ्याने प्रेस कॉन्फरन्स घ्यायची डेरिंग करते. पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का बघत बसले आहेत. आरोपींचे सर्वांच एकमेकांचे CDR काढले पाहिजे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे. न्यायासाठी आम्ही लढत राहू, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय? (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case)
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर 29 सप्टेंबर रोजी रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.























