एक्स्प्लोर

Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: टल्ल्या, पप्प्या आणि मीनाक्षी-राजा शिंदेंची पवार नगरात भेट, 5 कोटी ठरले, कट शिजवून पूर्णेकरांना संपवलं, सुषमा अंधारेंनी कच्छा चिठ्ठा मांडला

Sushma Andhare On Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Sushma Andhare On Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील (Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case) दोन्ही आरोपींना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश पवार आणि निखिल यादव या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोव्याला पळ काढताला गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली. पप्या शिंदेला याआधीच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण पाचपैकी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. टल्ली नावाचा मुख्य आरोपी आणि ज्याची ओळख पटली नाही असा आरोपी मोकाट आहे. निखिल यादवने प्रदीप पूर्णेकरांवर गोळ्या चालवल्या होत्या तर नितेश पवार उर्फ भावड्याने कोयत्याने वार केले होते. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुंटुंबीयांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी ठाण्यातून पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप आणि दावे केले. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे, टल्ल्या हे सगळे पवार नगर इथे भेटले होते. या लोकांच्या संदर्भात काय ती माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पाच कोटींचा व्यवहार झाला आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली, असा खळबळजनक दावाही सुषमा अंधारेंनी केला. 

प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर सुषमा अंधारे काय काय म्हणाल्या? (Sushma Andhare On Pradeep Purnekar Death Case)

प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहे. कडवट शिवसैनिक पूर्णेकर कुटुंबीयांसोबत ठामपणे उभा आहे. हे नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नुकसान आहे. दोन आरोपींना अटक झाली आहे. अजून एक अटक झालेला नाही. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची अटक झाली नाही. ठाणे आनंद दिघे यांचे ठाणे म्हणून ओळखलं जाते. धर्मीवीरांच्या आश्रमात त्यांच्या गटातील लोक दारू पिऊन धिंगाणा करण्यापर्यंत मजल जाते. रामने पहिल्या दिवशी जबाबमध्ये मीनाक्षी शिंदे यांचे नाव स्पष्टपणे घेतले आहे. यात क्लस्टरचे मुद्दा होता. मीनाक्षी शिंदे मूळच्या कर्नाटकच्या त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्रवर आक्षेप घेतला होता. मीनाक्षी शिंदे यांचे म्हणणे आहे की, हा AI ऑडिओ आहे. मग 8 महिन्यापूर्वी सायबर पोलिसांकडे तक्रार का नाही केली?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. मीनाक्षी शिंदे राजा शिंदे टल्ल्या हे सगळे पवार नगर इथे भेटले होते. या लोकांच्या संदर्भात काय ती माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे. पाच  कोटींचा व्यवहार झाला आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. पंधरा दिवसापासून रेकी सुरू होती. हॉटेल महाराजाचे cctv फुटेज काढा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

मीनाक्षी शिंदे यांना दोन्ही मुलींना परदेशात का पाठवाव्या लागल्या?, सुषमा अंधारेंचा सवाल (Sushma Andhare On Meenakshi Shinde)

क्लस्टरच्या कामात इथल्या गोरगरीब माणसाला हक्काचे घर मिळावे कोणाला एकही रुपया खाऊ देणार नाही. यासाठी प्रदीप पूर्णेकर लढत होते आम्ही ऑडिओ-व्हिडिओ दाखवत आहेत. सगळी माहिती देतो आहोत, तरीही पोलीस ताब्यात घेत नाही. 302 च्या एफआयआरमध्ये नाव असणारी मीनाक्षी शिंदे प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. पोलिसांची मजल होत नाही. तिला ताब्यात घेत नाही. मीनाक्षी शिंदे म्हणत आहेत माझा काही दोष नाही. काल देह बोली संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले. मीनाक्षी शिंदे यांना दोन्ही मुलींना परदेशात का पाठवाव्या लागल्या?मीनाक्षी शिंदे उजळ माथ्याने प्रेस कॉन्फरन्स घ्यायची डेरिंग करते. पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का बघत बसले आहेत. आरोपींचे सर्वांच एकमेकांचे CDR काढले पाहिजे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे. न्यायासाठी आम्ही लढत राहू, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

दिशा सालियन प्रकरणावरही सुषमा अंधारे बोलल्या, आतापर्यंत न पाहिलंलं रुप, आक्रमक पत्रकार परिषद- (Pradeep Purnekar Death Case)

सुषमा अंधारे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरही भाष्य केलं. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्याकडून घेतलं जात आहे. यावर सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एफआयआर माझ्या हातात आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं कुठेचं नाव नाही. जर आदित्य ठाकरेंचं एफआयआरमध्ये नाव असेल, आता मी देवळात पत्रकार परिषद घेतेय. मी पुन्हा राजकारणात दिसणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. कोकणातील टिल्ल्या, बालिश मेंदूच्या, आंबट शौकीन सांगतो की दिशा सालियनचा फोटो न्यूड होता. कोणतीही बॉडी (मृतदेह) पोस्टमॉर्टम जाते, मग पुरुष असो की स्त्री, ती न्यूडचं असते, असं सुषमा अंधारेंनी सांगितले. मी फार संयमी नेतृत्वाची आहे. त्यामुळे मी काही गोष्टी बोलताना थांबतेय, असं सुषमा अंधारेंनी सांगितले. 

सुषमा अंधारेंची वादळी पत्रकार परिषद, VIDEO:

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
Gokul Election : 'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget