एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाहीत; अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य

Akshay Shinde encounter: अक्षय शिंदे याच्या डोक्यात पोलिसांची गोळी शिरली होती, त्यामध्ये तो जागीच ठार झाला होता. देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांच्या कृतीचे समर्थन.

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. अक्षय शिंदे याने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) ठार झाला होता. या एन्काऊंटरबाबत विरोधक आणि न्यायालयाकडून अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रोखठोक मत मांडत पोलिसांच्या कृतीचे समर्थन केले आहे. एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही, असे त्यांनी म्हटले. ते गुरुवारी 'इंडिया टुडे कॉनक्लेव्ह'च्या व्यासपीठावरुन बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा, या मताचे आम्हीदेखील नाही. मला व्यक्तिश: कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कायद्याचे पालन व्हावे, असे वाटते. कायद्याच्या माध्यमातूनच गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे. ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे. अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला. आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर मुंबई, ठाणे आणि बदलापूर परिसरात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर 'बदला पुरा', 'देवाचा न्याय', 'देवाभाऊ सुपरफास्ट' अशा उपाध्या देऊन देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री म्हणून गौरव करण्यात आला होता. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हा प्रकार अयोग्य आहे. एन्काउंटरसारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये, असे फडणवीसांनी म्हटले. या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) नि्ष्पक्ष चौकशी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही विचार करत बसाल का? फडणवीसांचा सवाल

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेला बंदूक चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तो पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून, त्याचे लॉक उघडून फायरिंग करु शकतो का? पोलीस नॉर्मली डोक्यात गोळी घालतात का?, अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला न्यायाधीशांवर टीका करायची नाही. पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुमच्यासमोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही हा विचार करत बसाल का की असं मारायचं का तसं, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

आणखी वाचा

अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Pawan Kalyan On Allu Arjun : हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Beed: धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीवर धस म्हणतात, आका, उठो, गाडीत बसोJitendra Awhad PC : Walmik karad वर जाणीवपूर्वक कारवाई नाही,आव्हाडांची सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 30 December 2024Suresh Dhas Full PC :  प्राजक्ताचा विषय संपला, परवान्यांमागे आकाचे आका, धसांचा पुन्हा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Pawan Kalyan On Allu Arjun : हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : आधी मोर्चात, आता CMO कार्यालयात; खास माणसाकडून बीड मोर्चाची माहिती मुख्यमंत्र्यांकडे
आधी मोर्चात, आता CMO कार्यालयात; खास माणसाकडून बीड मोर्चाची माहिती मुख्यमंत्र्यांकडे
काळ्या आईची पूजा, गावखेड्यात 'वेळ अमावस्या'; ठाकरेंच्या आमदारानेही केलं वनभोजन
काळ्या आईची पूजा, गावखेड्यात 'वेळ अमावस्या'; ठाकरेंच्या आमदारानेही केलं वनभोजन
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
संतोष देशमुख हत्या प्रकरण!  बीड, धाराशिवनंतर आज बुलढाण्यातही मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी  
Santosh Deshmukh Case : मला शासनानं सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन; संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
मला शासनानं सांगावं, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन; संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली
Embed widget