एक्स्प्लोर

Parbhani Crime : जातीतील मुलीशी प्रेमविवाह, तरीही बापाने मुलाला संपवले, परभणीतील धक्कादायक घटना 

Parbhani Murder News :परभणीच्या पिंपरी देशमुख गावातील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून यातील आरोपी बाप अन भावाला पोलिसांनी अटक केली आहे.  

परभणी : जातीतील मुलीशी प्रेम विवाह (Love Marriage) केल्यानंतरही बापाने रागातून आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे  यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका तरुणीशी तीर्थक्षेत्र आळंदीस जावून प्रेम विवाह केला. दोन-अडीच महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते. 

प्रेमविवाह केल्याचा घरच्यांना राग

एक तर मुलाने प्रेमविवाह केला, त्यातच घरात त्रास देत असल्याचा राग मनात होता. याच रागातून माधव अवकाळे याने स्वतःच्या मुलास बोलावून घेतले. शेतात झोपी गेलेल्या गोविंद या मुलावर माधव आवकाळे आणि त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश आवकाळे या दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. त्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती कळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, उपनिरीक्षक गजानन काठेवाड, शिवकांत नागरगोजे, आप्पाराव वराडे, अतूल टेहरे, संदीप साळवे आदींनी घटनास्थळी धाव घेवून लगेचच तपास सुरु केला. त्यात आरोपी हे घरातीलच सदस्य असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर माधव आवकाळे आणि व्यंकटेश आवकाळे या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाप आणइ भावाला अटक करण्यात आली आहे.

प्रेमाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीला संपवलं

काही दिवसांपूर्वी परभणीत अशीच एक घटना घडली होती. मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केले होते. मात्र आईवडिलांचा याला विरोध होता. मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध असल्याने आईवडिलांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यामधील ही घटना समोर आली आहे. 

मुलीने इतर जातीतील मुलावर प्रेम करून लग्न करण्याचा निर्धार केला. मात्र तिच्या घरच्यांना हा निर्णय मान्य नसल्याने तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने केवळ काही नातेवाईकांना बोलावून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा ऑनर किलिंगचा प्रकार आता समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावात घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण आठ जणांवर हत्या, पुरावा नष्ट करणे या कलमाखाली पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget