एक्स्प्लोर

Palghar Crime : नेहरोलीमधील त्या तिघांची आत्महत्या नाही तर हत्याच, आरोपींचा शोध सुरू

Palghar Neharoli Murder : नेहरोलीतील एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि वडील यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पालघर : वाडा तालुक्यातील नेहरोली येथील एकाच कुटुंबातील त्या तिघांची आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याचं समोर आलं आहे. वाडा तालुक्यातील नेहरोली येथे एका घरामध्ये आई-वडील आणि मुलगी असे तिघांचे मृतदेह आढळून आले  होते. हे मृतदेह  कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही हत्या की आत्महत्या याबाबत पोलिसांचा शोध सुरू होता. मात्र या तिघांनी आत्महत्या केली नसून तिघांचीही हत्याच झाल्याचं आता  सिद्ध झालं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू झाला आहे. 
   
वाडा तालुक्यातील नेहरोली गावातली मुकुंद बेचरदास राठोड, कंचन मुकुंद राठोड आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड या तिघांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ माजली होती. आई आणि तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला होता. 

जवळपास 12 दिवसांपासून ते संपर्कात नसल्याने त्यांचा बारा दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे त्यांचे पूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे त्यांची हत्या की आत्महत्या याबाबत शाशंकता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी गोळा केलेल्या माहितीवरून वरील तिघांची ही हत्याच असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वाडा पोलीस  निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी दिली. या प्रकरणातील आरोपी फरार असून अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

नेमकं काय झालं? 

मूळचे गुजरात येथील असलेले मुकुंद बेचरदास राठोड त्यांच्या कुटुंबीयांसह नेहरोली या गावात वीस वर्षांपासून राहत होते. 18 ऑगस्टपासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेला त्यांचा मुलगा सुहास शोध घेण्यासाठी नेहरोली येथे आला. 

मुलाने कुलूप तोडले 

नेहरोली येथील घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी तर नाही ना या आशेने आजूबाजूचे सर्व दवाखाने सुहास यांनी तपासून पाहिले. आपल्या कुटुंबाचा कुठेही शोध लागला नसल्याने अखेर घरातील काही कागदपत्रे काढण्याच्या उद्देशाने कुलूप फोडले व यावेळी घरातील दृश्य बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. 

आई-मुलीचा मृतदेह बंद पेटीत सापडला

आई आणि मुलीचा मृतदेह एका बंद पेटीमध्ये आढळून आला तर वडिलांचा मृतदेह बाथरूम मध्ये पडलेला त्यांना दिसला. अनेक दिवसांपासून मृतदेह या ठिकाणी पडल्याने ते कुजलेल्या अवस्थेत होते. मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये या उद्देशाने बहुदा मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या. तात्काळ या घटनेची वाडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या वाडा पोलीस घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत. 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget