एक्स्प्लोर

NEET Paper Leak: सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे

NEET Paper Leak: धनंजय लोखंडे हा नीट परिक्षा घोटाळ्यातील महत्वाचा सुत्रधार असल्याचे समोर येत असून तो वेगवेगळ्या शहरातील एजंटमार्फत नीटची प्रश्नपत्रिका विकत होता.

NEET Paper Leak: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'युजी नीट' परीक्षेच्या पेपरफुटी (NEET Paper Leak) प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. धनंजय लोखंडे हा नीट परिक्षा घोटाळ्यातील महत्वाचा सुत्रधार असल्याचे समोर येत असून तो वेगवेगळ्या शहरातील एजंटमार्फत नीटची प्रश्नपत्रिका विकत होता. त्यासाठी त्याने एजंट म्हणून काही विद्यार्थ्यांचा वापर केल्याचे समजते.

NEET Paper Leak: सायबर सिक्युरिटीचा विद्यार्थी अटकेत

पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, शेषराव हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात 'सायबर सुरक्षा' (Cyber Security) या विषयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. ज्या हातांनी सायबर गुन्हे रोखणे अपेक्षित होते, त्याच हातांनी धनंजय लोखंडेच्या सांगण्यावरून पेपर विकत घेणारे विद्यार्थी शोधणे आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करण्याचे काम केले. परीक्षेच्या चार दिवस आधीच सोळंकीने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते, असे त्याच्या मोबाईल संभाषणातून स्पष्ट झाले आहे.

NEET Paper Leak: ब्युटी पार्लरच्या आडून रॅकेट

या घोटाळ्याचे धागेदोरे पुण्याच्या बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. येथे ब्युटी पार्लर चालवणारी मनिषा वाघमारे गेल्या तीन वर्षांपासून धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती. ती लोखंडेसाठी एजंट म्हणून काम करत असून, गरजू विद्यार्थ्यांना शोधून त्यांना प्रश्नपत्रिका विकण्याचे काम ती करत होती.

NEET Paper Leak: नाशिकचा शुभम खैरनार आणि 'टक्कल' करून पलायनाचा प्रयत्न

तर नाशिकच्या इंदिरानगर भागातून शुभम मधुकर खैरनार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम हा 'बीएएमएस'च्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून करिअर कौन्सलर म्हणून काम करत होता. त्याने कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिका संच हरियाणातील गुरुग्राम येथे पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी शुभमने चक्क टक्कल केले होते आणि तो देवदर्शनाच्या बहाण्याने पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, नाशिक पोलिसांनी दीड तासात शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या.

NEET Paper Leak: पुढील तपास सीबीआयकडे

धनंजय लोखंडे हा पुण्याच्या वाघोली भागात राहून हे संपूर्ण रॅकेट चालवत होता. या प्रकरणात आतापर्यंत 16 संशयितांची नावे समोर आली आहेत. राजस्थानच्या 'एसओजी' पोलिसांनी सुरु केलेल्या या तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या नावांचा समावेश आहे, हे सीबीआयच्या चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?

Embed widget