एक्स्प्लोर

Navi Mumbai: विदेशी नागरिकांवर पोलिसांची मोठी कारवाई; अफ्रिकन नागरिकांकडून 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Navi Mumbai Crime: विदेशी नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 14 अफ्रिकन नागरिकांकडून 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

नवी मुंबई: नवी मुंबईत (Navi Mumbai) बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि अंमली पदार्थांचे जाळे शहरात पसरू पाहणाऱ्या विदेशी आफ्रिकन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. नवी मुंबईतील सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 14 आफ्रिकन नागरिकांकडून 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्याचा आफ्रिकन नागरिकांचा प्रयत्न

नवी मुंबई परिसराला टार्गेट करत तेथे अंमली पदार्थांचं जाळं गेल्या काही वर्षांपासून पसरवलं जात होतं, यामध्ये मुख्यत्वे आफ्रिकन नागरिकांचा सहभाग असल्याचं अनेक वेळा दिसून आलं होतं. शांत शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत अनेक मोठ्या शाळा, कॅालेज, उच्च शिक्षणाच्या संस्था कार्यरत आहेत. दुसरीकडे नवी मुंबईत आयटी हब देखील विस्तारत आहे. पुण्यानंतर नवी मुंबईला एज्यूकेशन हब आणि आयटी हब म्हणून पाहिलं जात असल्याने येथील तरूणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यासाठी अफ्रिकन नागरिक कार्यरत होते.

पाच कोटींचे अंमली पदार्थ जप्त

ड्रग्जच्या जाळ्यातून नवी मुंबईला वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी विशेष मोहीम हाती घेत ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला. सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत 75 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं, यातील 14 जणांकडे ड्रग्ज सापडले आहेत.  या मध्ये 898 ग्रॅम कोकेन, 300 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, ट्रायमॅाल हायड्रोक्लोराईडच्या 36 हजार 640 ट्रप्स असे 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

आफ्रिकन नागरिकांना केलं भारतातून हद्दपार

ड्रग्ज विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल आणि वाहनंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 9 जणांवर पासपोर्ट अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे, तर 31 जणांना लिव्ह इंडिया नोटीस देवून भारतातून हद्दपार करण्यात येणार आहे. सदर कारवाईसाठी अधिकारी, कर्मचारी मिळून 600 जणांचा स्टाफ वापरण्यात आला होता. 

मुंबई पाठोपाठ पुण्यालाही केलं टार्गेट

पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेलं आयटी क्षेत्राचं वलय, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती यामुळे मुंबईपाठोपाठ अंमली पदार्थ तस्करांचं पुणे हे लक्ष्य आहे. मात्र असं असतानाच अंमली पदार्थ तस्कारांना पुणे पोलीस कारवाईने चोख उत्तर देत आहेत. 

2019 ते 2021 या तीन वर्षांत पुणे पोलिसांनी 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. मागील दहा वर्षांच्या तुलनेत पाच महिन्यांत सर्वाधिक म्हणजे 7 कोटी 24 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. साडेपाच वर्षांत 22 कोटी 17 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरसारखे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या सर्व प्रकारांत नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai: अमली पदार्थ विभागाचे पोलीस असल्याचं भासवून तरुणाकडून उकळले साडेपाच लाख; मुंबईतील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget