कॉलेजवरून घरी येणाऱ्या तरूणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Navi mumbai Crime News : रबाले महामार्गावर कॉलेजवरून एक युवती घरी जाताना त्याचंच घराजवळ राहणाऱ्या युवकांने तू माझ्याशी का बोलत नाही? म्हणून चाकूने वार केला
Navi mumbai Crime News : रबाले महामार्गावर कॉलेजवरून एक युवती घरी जाताना त्याचंच घराजवळ राहणाऱ्या युवकांने तू माझ्याशी का बोलत नाही? म्हणून चाकूने वार केला होता. या हल्यात तरूणीच्या पाठीवर गंभीर जखम झाल्याने तिला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्या प्रकरणी रबाळे पोलीसांनी आरोपीला ऐरोलीतून अटक केली आहे. रबाळे येथे एका 20 वर्षीय युवतीवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सदर हल्ला एकतर्फी प्रेमातून करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडिता तरुणी दोघेही रबाळे एमआयडीसी परिसरात राहणारे आहेत.
कुंदन गौडा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडिता तरुणी हे दोघेही उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. एकाच गावातील असल्याने दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखतात. गौडा हा २२ वर्षीय युवक पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र पीडिता त्याला प्रतिसाद देत नव्हती. कॉलेजमधून मुलगी घराकडे जात असताना आरोपीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने अचानक तिच्या समोर येत तिच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पिडीताने प्रसंगावधान राखत वळली असता चाकूचा वर तिच्या पाठीवर दोन ठिकाणी झाला. पीडिता सध्या नेरुळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी आरोपी कुंदन गौडाला रबाले एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live