एक्स्प्लोर

Navi Mumbai Crime: बॉलिवूडपट 'स्पेशल 26' स्टाईल चोरी; पोलीस असल्याचा बनाव रचत टोळक्यानं माजी PWD अधिकाऱ्याला 36 लाखांना लुटलं

Navi Mumbai Crime: चोरांनी बॉलिवूड चित्रपट 'स्पेशल 26'च्या पटकथेप्रमाणे बनावट सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव रचला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माजी अधिकाऱ्याला गंडा घातला आहे. 

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत (Navi Mumbai News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा चोरांच्या टोळीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माजी अधिकाऱ्याची फसवणूक केली आहे. या टोळीनं एका आठवड्यापूर्वी ऐरोलीतील एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या घरात घुसून सुमारे 36 लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, चोरांनी बॉलिवूड चित्रपट 'स्पेशल 26'च्या पटकथेप्रमाणे बनावट सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव रचला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माजी अधिकाऱ्याला गंडा घातला आहे. 

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) स्टारर 'स्पेशल 26' (Special 26) ची कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 26 लोकांची टोळी सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून ज्वेलर्सच्या घरावर दरोडा टाकते आणि घराची खोटी झडतीही घेते. असाच काहीसा प्रकार या सहा चोरांच्या टोळक्यानंही केला आहे. नवी मुंबई दरोड्यात सहा सदस्यांच्या टोळीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यानं दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, 21 जुलै रोजी दुपारी सहा जण कांतीलाल यादव यांच्या घरात घुसले. या टोळीचं नेतृत्व करणाऱ्या एका दाढीवाल्या व्यक्तीनं ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचा दावा केला. तसेच, तुमच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यामुळेच ते घराची झडती घेण्यासाठी आले असल्याचंही सांगितलं. टोळक्यानं यादव यांच्या घराची झाडाझडती सुरू केली. तसेच, झडती घेण्यापूर्वी यादव आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल जप्त करुन स्वतःजवळ ठेवले. तसेच, टोळक्यातील एकानं झाडाझडती पूर्ण होईपर्यंत यादव यांना त्याच्या बाजूला बसण्यास सांगितलं. 

मौल्यवान वस्तू घेऊन टोळकं फरार 

यादव यांनी दाढीवाल्या व्यक्तीचे ओळखपत्र दाखविण्याचा आग्रह धरला, मात्र झडतीनंतर दाखवले जाईल, असे सांगून त्यांनी नकार दिला. त्यांनी त्यांना शेजारी बसण्याचा आदेश देताच त्यांच्या पाच साथीदारांनी तीन बेडरूमच्या फ्लॅटमधील तीन कपाटं फोडून आतमध्ये 25.25 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन, एक अंगठी आणि 3.80 लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट असा एकूण 4.20 लाख रुपयांचा ऐवज सापडला. 40,000 रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, 80,000 रुपये किमतीचे हिरे जडलेलं सोन्याचं मंगळसूत्र आणि किमान 10,000 रुपये किमतीची दोन घड्याळं हिसकावून नेण्यात आली. टोळीतील सदस्यांनी कपाटातील मौल्यवान वस्तू चामड्याच्या पिशवीत भरून तिथून पळ काढला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

औरंगाबाद हादरलं! दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने घेतला गळफास, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget