एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या नावाने माजी नगरसेविकेकडून पैशांची मागणी, संशय आल्याने फसवणूक टळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबई महापालिका आयुक्त असल्याचं भासवत इथल्या एका माजी नगरसेविकेकडे व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र वेळीच हा मेसेज बनावट असल्याचा संशय आल्याने या माजी नगरसेविकेची फसवणूक टळून पैसे वाचले.

Navi Mumbai Crime : ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने नकळतपणे पैशांची मागणी करुन गंडवण्याचे प्रकार नित्याची बाब झाली आहे. मात्र थेट महापालिका आयुक्तांच्या नावानेच पैसे उकळण्याचा प्रकार पहिल्यांदा समोर आला. नवी मुंबईत (Navi Mumbai) हा प्रकार घडला. नवी मुंबई महापालिका आयुक्त (Navi Mumbai Municipal Corporation) असल्याचं भासवत इथल्या एका माजी नगरसेविकेकडे व्हॉट्सअॅप या मोबाईल मेसेजिंग अॅपवर पैशांची मागणी करण्यात आली होती. पैशांची मागणी करणाऱ्याने गुगल पेची (Google Pay) एक लिंक देखील यासाठी पाठवली होती. मात्र वेळीच हा मेसेज बनावट असल्याचा संशय आल्याने या माजी नगरसेविकेची फसवणूक टळून पैसे वाचले.

मनपा आयुक्तांच्या नावाने मेसेज आणि पैशांची मागणी 
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात वैशाली तुकाराम नाईक राहत असून त्या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या मोबाईल फोनवर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नावाने मेसेज आला होता. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला जुजबी चौकशी केली. वैशाली नाईक यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित प्रभागातील समस्यांबाबत निवेदन दिले होते. आयुक्त राजेश नार्वेकर कदाचित त्याच संदर्भात मेसेज पाठवत असतील, असं नाईक यांना वाटलें. मात्र काही वेळाने तुम्ही गुगल पे शी संलग्न आहात का? अशी विचारणा केली. यावर वैशाली नाईक यांनी होकार दिल्यावर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली आणि पाच हजार रुपये पाठवण्याची विनंती केली. 

संशय आल्याने फोन नंबरची पडताळणी केली
मनपा आयुक्त पाच हजार रुपये का पाठवायला सांगतील, मुळात आयुक्त पैसे पाठवण्यास सांगतात? असे प्रश्न वैशाली नाईक यांना पडला. संशय आल्यामुळे नाईक यांनी उत्तर देणे बंद केलं. याबाबत त्यांनी कुटुंबातील काही व्यक्तींशी चर्चा केली आणि आयुक्त राजेश नार्वेकर यांचा क्रमांकही मिळवला. नार्वेकर यांच्या नावाने चँटिंग केलेला क्रमांक आणि परिचित व्यक्तीकडून मागवलेला राजेश नार्वेकर यांचा फोन नंबर वेगवेगळा होता. तसंच हा बनावट संदेश असल्याची खात्री नाईक यांना झाली. यानंतर हा प्रकार मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कानावर घालून पैसे मागणाऱ्या व्यक्तीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याचं वैशाली नाईक यांनी सांगितलं.

फसवणुकीच्या बातम्या वाचनात आल्याने पैसे वाचले
दरम्यान एखाद्या संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यानंतर बँक खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर होण्याची प्रकार घडत असल्याच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. त्यामुळे मनपा आयुक्तांच्या नावाने पाठवलेल्या लिंकबाबत संशय आल्याने त्यावर क्लिक केलं नाही आणि पैसे वाचले, अशी प्रतिक्रिया वैशाली नाईक यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde MLA : आमदारांना मंत्रिपदाची आस? पण मंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?Sanjay Raut On Chief Minister : मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊतांकडून टोलेबाजी करत शुभेच्छाSpecial Report : Nalasopara Building : डंपिंग ग्राऊंडच्या जागेवर इमारती,पालिकेककडून कारवाई #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Embed widget