एक्स्प्लोर

Nashik TCS Case: निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांची चौथ्यांदा चौकशी होणार, धागेदोरे थेट इम्तियाज जलीलांपर्यंत पोहोचणार? TCS प्रकरणात मोठी अपडेट

Nashik TCS Case: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आता एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे.

Nashik TCS Case: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या टीसीएस (TCS) लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात (Conversion Case) आता एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएम (AIMIM) पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) यांची विशेष तपास पथकाकडून (SIT) सोमवारी पुन्हा एकदा कसून चौकशी केली जाणार आहे.

Nashik TCS Case: मतीन पटेल यांची आतापर्यंत 3 वेळा चौकशी

या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एसआयटीने (SIT) नगरसेवक मतीन पटेल यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली आहे. या प्रकरणातील मुख्य दोषारोपपत्रामध्ये (Charge Sheet) मतीन पटेल यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. मुख्य फरार आरोपी निदा खान हिला मतीन पटेल यांनी नेमके कोणाच्या सांगण्यावरून आश्रय दिला? या मुख्य मुद्द्यावर पोलीस सध्या तपास करत आहेत.

तपासादरम्यान एसआयटीने मतीन पटेल यांचा मोबाईल जप्त केला असून, त्यातील मोबाईल डेटा (Mobile Data) आणि इतर तांत्रिक पुराव्यांची (Technical Evidence) सखोल तपासणी केली आहे. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Imtiaz Jaleel: माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर?

मिळालेल्या माहितीनुसार, मतीन पटेल हे एआयएमआयएम (MIM) पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या संपर्कात असल्याची माहिती एसआयटीला तांत्रिक तपासातून मिळाली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या चौकशीत जर मतीन पटेल यांच्याकडून काही ठोस माहिती किंवा पुरावे मिळाले, तर एसआयटी माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी (Investigation) बोलावण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Nashik TCS Case: 8 आरोपींना अटक, पुरवणी दोषारोपपत्राची तयारी

नाशिकच्या या बहुचर्चित प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र दाखल झाले असून, मोबाईल डेटा आणि तांत्रिक तपासातून समोर आलेल्या नवीन पुराव्यांच्या आधारे पोलीस येत्या काही दिवसांत न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.

Mateen Patel: मतीन पटेल यांनी फेटाळले सर्व आरोप

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर नगरसेवक मतीन पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात विनाकारण जोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला असून सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे पटेल म्हणाले आहेत.

Mateen Patel: सोमवारच्या चौकशीत काय माहिती समोर येणार? 

इम्तियाज जलील यांच्याशी असलेल्या संपर्कावर स्पष्टीकरण देताना पटेल यांनी सांगितले की, "इम्तियाज जलील हे माझे राजकीय नेते आहेत. त्यांच्याशी माझ्या फोनवर केवळ वैयक्तिक किंवा राजकीय कारणांवरूनच चर्चा झाली आहे. निदा खान प्रकरणात आमचा कोणताही संपर्क झालेला नाही. माझ्या फोनचे सर्व कॉल रेकॉर्ड्स पोलिसांकडे उपलब्ध आहेत." या प्रकरणात जलील यांना राजकीय हेतूने विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत, आपण याविरोधात न्यायालयीन लढा लढणार असल्याचा निर्धार मतीन पटेल यांनी व्यक्त केला आहे. आता सोमवारी होणाऱ्या मतीन पटेल यांच्या चौकशीत नेमकी काय नवीन माहिती उघडकीस येते आणि एसआयटी पुढील काय पाऊल उचलते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik : झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget