एक्स्प्लोर

Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येची धक्कादायक घटना (Ambernath News) समोर आली आहे. आईच्या प्रियकराने मुलाच्या डोक्यावर वरवंट्याने मारा करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी आपल्या सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशी सह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, तिचे विकास सिंग याच्यासोबत प्रेम संबंध होते. पोलीस तपासानुसार, मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने विकास सिंग याने हुसनैनला मारण्याचा प्लॅन केला. 

नेमकं काय घडलं? (Thane Ambernath Crime Marathi News)

विकास सिंग याने प्लॅननुसार मुलाच्या डोक्याचा घाव करून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या हुसनैनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी विकास सिंगला अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, घटनेमागील आणखी कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना का देण्यात आली नाही आणि मुलाची आई सकीना कुरेशी हिने घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या अमानुष घटनेने अंबरनाथ मध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.

ठाण्यातही हादरवणारी घटना- (Thane Crime News)

 ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराजा हॉटेल लॉज या ठिकाणी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याने एकच खळबळ (Thane Crime Marathi News) उडाली आहे. उशीच्या सहाय्याने तोंड दाबून प्रियकराने प्रेयसीला संपवल्याचं समोर आलं आहे. नंदकिशोर गाडेकर वय 27 वर्षे हा विष्णू नगर डोंबिवलीचा रहिवासी असून आरोपीला ठाणे नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव संध्या म्हस्के वय वर्षे 23 असून ती भांडुपची रहिवासी आहे. दोघांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र हत्या करण्यामागचे कारण ठाणे नगर पोलीस तपास करत आहे. (Thane Crime News)

मागील काही वर्षांपासून तिचे डोंबिवली येथे राहणाऱ्या नंदकिशोर गांडेकर याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. गांडेकर हा देखील विवाहित आहे. काल दुपारी ते जांभळीनाका येथील महाराजा लॉजवर आले होते. काल रात्री गांडेकर हा तेथून निघून गेला. परंतु संध्या तिथेच होती. त्यामुळे लॉजवरील कर्मचाऱ्याने पाहणी केली असता, संध्या ही बेशुद्ध आढळून आली. या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांनी ठाणेनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथक दाखल झाले. संध्या हिचा या घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, गांडेकर हा जांभळीनाका येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची चौकशी केली असता, संध्या हिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदकिशोर गांडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांना दिली. (Thane Crime News)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Thane Crime News: लॉजमध्ये गेले, प्रियकराने प्रेसयीसोबत उशीने नको नको ते केले; ठाण्यातील हादरवणारी घटना

Solapur Crime News:पहिले 10 चिमुकलीला बादलीत बुडवून संपवलं, मग 6 वर्षांच्या मुलीकडे नजर गेली, पोर म्हणाली, आई, मी शाळा शिकते...; सोलापुरमधील सुन्न करणारी घटना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget