एक्स्प्लोर

Nashik : झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे

Nashik TCS  Conversion Case Update : सोशल मीडियावर उपलब्ध असलेले झाकीर नाईकचे व्हिडीओ वापरून नाशिकच्या पीडितेचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात असल्याचं चार्जशीटमधून समोर आलं आहे. 

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) महिला कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक आणि मोठे खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी निदा खान हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पीडितेचं धर्मांतर करण्यासाठी तिला इस्लाम अॅप डाऊनलोड करून देण्यात आलं होतं. तसेच ऑफिसच्या पॅट्रीमध्ये तिच्यासोबत अश्लील चाळेही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  2022 ते 2026 या चार वर्षांच्या कालावधीत पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि छळाचा संपूर्ण घटनाक्रम या चार्जशीटच्या माध्यमातून समोर आला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या या अधिकृत दोषारोपपत्रात थेट कट्टरवादी झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा तपासातून झाला आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेले झाकीर नाईकचे व्हिडीओ वापरून पीडितेचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात होता.

Nida Khan TCS : दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खानवर गंभीर आरोप

पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटनुसार, या प्रकरणात दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेचे शोषण केले. या आरोपींनी मिळून पीडितेच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिला छळले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मतीन पटेल याच्यावरही पोलिसांनी ठपका ठेवला असून, मुख्य आरोपी निदा खानची अटक टाळण्यासाठी तिला आश्रय दिल्याचा आरोप मतीनवर आहे.

TCS Conversion Charge Sheet : बुरखा घालण्याची सक्ती आणि नाव बदलले

आरोपींनी पीडित तरुणीला 2022 मध्ये टीसीएस (TCS) कंपनीत नोकरी मिळवून दिली होती. त्यानंतर हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यं करून त्यांनी पीडितेच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावल्या. आरोपी दानिश शेख याने पीडितेला लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्याशी वारंवार इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या जातीवरून अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर करून मानसिक छळ केला.

पीडितेचे धर्मांतर करण्यासाठी तिच्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने इस्लाम धर्माचे विशेष अॅप डाऊनलोड करून देण्यात आले. याशिवाय तिला सातत्याने इस्लाम धर्माशी संबंधित रील्स, व्हिडीओ आणि फोटो पाठवले जात होते.

पीडितेला इस्लाम धर्माची पुस्तके वाचण्याची सक्ती करण्यात आली. तिच्या इच्छेविरोधात तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले गेले, तसेच रोजा ठेवण्यासाठी तिच्यावर अतोनात दबाव आणण्यात आला. आरोपींनी पीडित हिंदू तरुणीचे नाव बदलून 'हनिया' असं मुस्लिम नाव ठेवलं होतं. तिने नमाजपठण केले नाही, तर तिचे कुटुंबीय नरकात जातील, अशी भीती दाखवून तिचे मानसिक खच्चीकरण केलं गेलं.

TCS Office Exploitation Case : ऑफिसच्या पॅन्ट्रीत विनयभंग आणि पैशांची लूट

मुख्य आरोपी दानिशने केवळ पीडितेचे शारीरिक शोषण केले नाही, तर तिच्याकडून अत्यंत किमती वस्तू आणि मोठी रोख रक्कमही लुबाडली. तर दुसरा आरोपी तौफिक अत्तार याने थेट ऑफिसच्या पॅन्ट्रीमध्ये पीडितेचा विनयभंग करत तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. 

या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: नाशिकमध्ये पहाटे भीषण अपघात; सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू
नाशिकमध्ये पहाटे भीषण अपघात; सोमठाणे घाटात प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस उलटली, एकाचा जागीच मृत्यू
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Operation Tiger: ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार? नाशिकमध्ये सस्पेन्स वाढलेला असतानाच दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र, 'त्या' व्हायरल फोटोने भुवया उंचावल्या!
ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार? नाशिकमध्ये सस्पेन्स वाढलेला असतानाच दोन्ही शिवसेनेचे नेते एकत्र, 'त्या' व्हायरल फोटोने भुवया उंचावल्या!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
Embed widget